इंटरनेटवर रोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण त्यापैकी मोजकेच व्हिडिओ अतिशय सुंदर असतात. सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सचे तंत्रज्ञान वापरून रोज नवनवीन फोटो समोर येत असतात ज्यामध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडील गोष्टी चित्ररुपात साकारल्या जातात. पण एआय तंत्रज्ञान आता आले आहे, पण एखाद्या काल्पनिक घटनेपासून वास्तविक घटनांपर्यंत, कोणतेही चित्र हुबेहूब साकरण्याची कला अनेक कलाकरांना आधीपासूनच अवगत आहे.

कोणतेही एआय तंत्रज्ञान न वापरता काही कलाकर फक्त आपल्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर अविश्वसनीय चित्र कागदावर रेखाटतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. आज आम्ही पुण्यातील कलाकाराची एक अविश्वसनीय कलाकृती तुम्हाला दाखविणार आहोत.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
people perform Rangoli Art showcasing Indian culture in America
अमेरिकेत तरुणांनी काढली भारतीय संस्कृती दर्शवणारी रांगोळी; लोक पाहतच राहिले, VIDEO होतोय व्हायरल
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…

पुण्यातल्या फुलविक्रेत्या आजीबाईंचं कलाकारने रेखाटलं चित्र

कलाकार चैतन्य लिमये(Artist Chaitanya Limaye) यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये फुलविक्रेत्या महिलेचे चित्र तयार केलं आहे. ही महिला आपले फुलांच्या दुकानात फुलांचे हार तयार करत आहे. तिच्या आसपास वेगवेगळी फुले ठेवलेली आहेत आणि काही फुलांचे हार तयार केलेले आहेत. कलाकार चैतन्य यांनी हे सर्व दृश्य आपल्या चित्रात रेखाटले आहे. चित्र काढताना आणि त्यात रंग भरताना व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.

हेही वाचा – Google Doodle : ही पाणी पुरी खायची नाही तर खेळायची; जाणून घ्या कसा खेळायचा ‘हा’ मजेशीर गेम

हेही वाचा – हवेत उडणाऱ्या कारचा व्हिडीओ पाहिला का? ‘या’ कंपनीने तयार केली Electric Flying Car

चित्र पाहून आजीबाईंच्या चेहऱ्यावर उमटले हसू

”मी या वृद्ध महिलेला तिच्या फुलांच्या दुकानात हार तयार करताना पाहिले. तिचे सर्व लक्ष सर्व ताज्या आणि रंगीबेरंगी फुलांचा हार तयार करण्यावर होते. होते. त्या कोपऱ्याच्या दुकानात या महिलेला तिच्या दिनक्रमात मग्न पाहून मला तिचं चित्र काढावस वाटलं. तिला स्केच आवडले! तिने तिच्या दुकानाबद्दल सांगितले. ते पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करत आहे आणि आता ७० वर्षांपेक्षा जास्त जुने आहे! या महिलेचं चित्र काढण्याचा आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरीलअमूल्य हसू पाहण्याचाअनुभव खूप छान होता.” असे त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा – आता बातम्या सांगणार AI न्युज अँकर! ओडीसाच्या खासगी चॅनलने लॉन्च केली व्हर्च्युअल अँकर ‘लिसा’; पाहा व्हिडीओ

हा व्हिडिओ २.४ दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. स्केच पाहून महिला कशी हसली यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला?