Viral Video Of Pune Auto Driver : आपल्यातील बरेच जणांना रिक्षाने प्रवास करायला भरपूर आवडते. कारण – हा प्रवास अगदी कमी खर्चिक आणि आरामदायक असतो. तसेच बससाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा पटकन रिक्षात बसून अगदी कमी वेळेत पोहचता येते. तर या प्रवाशांचा हाच प्रवास अगदी आनंदाचा जाण्यासाठी अनेक रिक्षाचालक सुद्धा स्वतःची रिक्षा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने सजवतात. त्यात झाडे, आरसा, विविध बॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर, तर अगदी गाणी ऐकण्यासाठी स्पीकर सुद्धा या रिक्षात लावलेले असतात. पण, आज सगळ्यांना मागे टाकत पुण्याच्या रिक्षा चालकाची एकच चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याच्या रिक्षा चालकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एक प्रवासी प्रवास करण्यासाठी रिक्षात थांबवतो आणि त्यात बसतो. तर रिक्षात बसल्यावर चक्क त्याला रिक्षात फिश टॅंक दिसतो. ड्रायव्हरच्या सीटच्या मागे फिश टॅंक बसवलेला आहे. त्यात रंगीबेरंगी मासे पोहताना दिसत आहेत. फिश टॅंकच्यावर एक स्पीकर लावण्यात आला आहे आणि पूर्ण रिक्षा डिस्को लाइट्सने सजवली आहे आणि रिक्षाचे जणू काही मत्स्यालयात रूपांतर केले आहे असे वाटते आहे. नक्की बघा हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

https://www.instagram.com/p/DFK5bj2hyHj/?hl=en

रिक्षाचालक दिवस-रात्र आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतात. अनेक रिक्षाचालक स्वतःचा आणि रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आनंदी व्हावा यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, तुम्ही एखादे मत्स्यालय बघायला आला आहात असेच तुम्हाला वाटेल. कारण चालकाने रिक्षात अगदी डिस्को लाइट्स, वेगवेगळ्या रंगाचे फोकस, स्पीकर आणि फिश टॅंक लावून रिक्षाची सजावट केली आहे आणि बँग्राऊंडमध्ये एक बॉलिवूड गाणे सुद्धा लावून ठेवले आहे.

पुणे तिथे काय उणे

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @thatssosakshi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘पुणे तिथे काय उणे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून ‘या रिक्षात बसण्याचे जास्त पैसे लागणार का, या रिक्षात बसण्यासाठी मी जास्त पैसे द्यायला तयार आहे, मी प्रवास करताना अशा रिक्षा मला कधीच दिसत नाहीत’ ; आदी वेगवेगळ्या कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.

गेल्या वर्षी, एका बंगळुरू रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षाचे मिनी लायब्ररीत रूपांतर केले होते. रविला लोकेश, मार्केटप्लेस मॅनेजर, यांनी ऑटो ड्रायव्हरच्या नाविन्यपूर्ण सेटअपचा फोटो लिंक्डइन पोस्टमध्ये शेअर केला होता जो नोव्हेंबरमध्ये प्रचंड व्हायरल झाला होता. तर आज पुण्याच्या रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.