Viral Video : काही लोकांना त्यांच्या गाडीच्या मागे पुढे सुंदर संदेश लिहायची आवड असते. हल्ली सोशल मीडियावर असे अनेक गाडीचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणी गाडीच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतात तर कोणी मिश्किलपणे सुचना लिहितात. कोणी आई वडिलांविषयी आदर व्यक्त करत त्यांचे आभार मानतो तर कोणी मजेशीर ज्योक्स लिहितो.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पुण्यातील आहे. पुण्यातील या तरुणाने गाडीवर असे काही लिहिले की तु्म्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चारचाकी गाडी दिसेल. या गाडीच्या मागील काचावर एक सुंदर संदेश लिहिला आहे. या काचेवर इन्फीनीटीचा लोगो काढला आहे. डाव्या बाजूला विठ्ठलाच्या टिळाचे चिन्ह आणि दुसरीकडे गुगल मॅपचे चिन्ह काढले आहेत आणि त्याखाली लिहिलेय, “दोन्ही पण रस्ता चुकल्यावर योग्य मार्ग दाखवतात”
तुम्हाला यावरून कळेल की त्या कारमालकाला म्हणायचे आहे की जेव्हा आपण रस्ता चुकवतो, तेव्हा गुगल मॅप आणि विठ्ठल रस्ता दाखवतो.ही क्रिएटिव्ही पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सध्या आषाढी वारी सुरू आहे. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला निघाले. वारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत आहे. विठ्ठलाचे सुद्धा व्हिडीओ आणि फोटो चर्चेत येत आहे. अशात हा हटके व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : ‘गुलाबी साडी’ गाण्यावर साऊथ इंडियन लूकमध्ये तरुणांचा हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “माणूस त्याच्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो” भर पावसात हातगाडी वाहून नेणाऱ्या काकांचा VIDEO होतोय व्हायरल

kanojineha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एक योग्य मार्ग दाखवतो आणि एक योग्य मार्गावर आणतो राम कृष्ण हरी….” तर एका युजरने लिहिलेय, “कधी तरी उजवी बाजू ही रस्ता दाखवण्यात चुकू शकते पण डावी बाजू कधी ही नाही चुकू शकत..!” आणखी एका युजरने लिहिलेय, “उजवा चुकीच्या वाटेवर नेतो बऱ्याचदा पण आपला डावा जरी असला तरी युगे अठ्ठावीस विटेवर उभा राहून योग्यच वाटेवर नेतो.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी ‘राम कृष्ण हरी’ लिहिलेय.