Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती, भाषा या शहराची ओळख आहे. येथील अनेक गोष्टी लोकप्रिय आहे. पुणेरी पाट्यांपासून खाद्य संस्कृतीपर्यंत अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पुणेरी लोक, पीएमटी बस, पुणेरी पाट्या, येथील गमती जमतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात.

अलीकडे पुण्यातील रिक्षावाल्यांच्या पाट्या सुद्धा तितक्याच व्हायरल होताना दिसतात. पुण्यातील रिक्षाचालक त्यांच्या ऑटोमागे संदेश लिहितात. हा संदेश कधी मजेशीर तर कधी प्रेरणा देणारा असतो. काही लोक संदेश लिहिलेल्या रिक्षाचालकाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका रिक्षा चालकाने त्याच्या रिक्षेवर खूप सुंदर संदेश लिहिला आहे. हा संदेश वाचून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (A Punekar Autorickshaw Drivers Heartwarming Message for parents on his Autorickshaw Goes Viral on social media)

पुण्यातील रिक्षावाल्यांच्या पाट्या खरंच वाचण्यासारख्या असतात

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्याच्या रस्त्यावरून जाणारी एक रिक्षा दिसेल. या रिक्षेच्या मागील बाजूस एक सुंदर संदेश लिहिला आहे. आईवडिलांवर आधारित हा संदेश आहे. रिक्षावर लिहिलेय, “जीवनामध्ये काहीही बना किंवा बनू नका पण आई वडिलांचा आधार नक्की बना” हा संदेश वाचून कोणीही भावुक होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्यातील रिक्षावाल्यांच्या पाट्या खरंच वाचण्यासारख्या असतात.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वी सुद्धा पुण्यातील अशा अनेक रिक्षावर लिहिलेले संदेश व्हायरल झालेले आहेत. एका रिक्षाचालकाने रिक्षाच्या मागील छोट्या खिडकीच्या खाली बापाविषयी काळजाला भिडणारा संदेश लिहिला होता. “कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप…” तर एका रिक्षाचालकाने लिहिले होते, ““हमें तो लुटा OLA UBER ने Rapido में कहा दम था, हमें जहाँ भेजा वहाँ का, भाडा ही कम था..”

Story img Loader