Viral Video : फोन हा प्रत्येकाला अतिशय प्रिय आहे. आज प्रत्येकाच्या हातात फोन असतो. फोनशिवाय आपण आयुष्याची कल्पना करू शकत नाही. सोशल मीडिया, फोन, मेसेज, मेल पासून आर्थिक व्यव्हारापर्यंत फोन हा अत्यंत गरजेचा आहे. लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येकाला फोनची क्रेझ आहे. तरुणांमध्ये नवनवीन फोनची खूप क्रेझ दिसून येते. सध्या सगळीकडे आयफोन विषयी बोलले जाते. आयफोन तसा महागडा फोन आहे पण प्रत्येकाची इच्छा असते की आयफोन घ्यावा पण समजा तुमच्याकडे आयफोन आहे आणि तो चोरीला तर काय होईल? काही लोकांना ही कल्पना सुद्धा करावीशी वाटत नाही. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बसमध्ये प्रवास करताना एका तरुणाचा आयफोन हरवला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला एका ठिकाणी पीएमटी बस थांबलेली दिसेल. बसमधून एक एक प्रवासी खाली उतरत आहे आणि एक तरुण त्या सर्व प्रवाशांच्या बॅग तपासत आहे. तुम्हाला वाटेल नेमकं काय घडलं? या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे, पीएमटी बसमधून या तरुणाचा आयफोन चोरीला गेला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की प्रवासी या तरुणाला त्यांच्या बॅग तपासायला देत आहे. या तरुणाला त्याचा आयफोन सापडला की नाही, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही घटना हडपसर हद्दीतील आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

mh12_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “1.50 लाखाचा मोबाईल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्याच हडपसर मध्ये माझा पण मोबाईल चोरीला गेला… पोलीस complaint केली, काही नाही झाले… दररोज त्या हडपसरमध्ये कोणाचा ना कोणाचा मोबाईल चोरीला जातो… पोलीस काय करतात काय माहीत… मला तर एकाने सांगितलं की तक्रार करून काहीही फायदा नाही. ” तर एका युजरने लिहिलेय, “माझा पण गेला, एक महिना झाला” आणखी एका युजरने लिहिलेय, “नाही सापडत भावा माझा पण रिअलमी 8 प्रो गेला होता..” अनेक युजर्सनी त्यांचे फोन हरवल्याचे अनुभव सांगितले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A punekar young guy lost iphone in pmt bus video please take care while travelling in a pmt bus pune video viral on social media ndj