Man Save Dog on Railway Track :माणुसकी म्हणजे प्रेम, जाणीव, इतरांचा आदर करणे, निस्वार्थपणे इतरांची मदत करणे, माणूस म्हणून इतरांची कदर करणे. पण आजच्या काळात माणसूकी खरचं शिल्लक आहे का असा प्रश्न वारंवार पडतो. आज काल लोक एकमेकाचा आदर करण्याऐवजी एकमेकांबरोबर भांडताना दिसतात, प्रेम करण्याऐवजी एकमेकांचा द्वेष करतात, इतरांच्या कामाची आणि प्रेमाची जाण ठेवण्याऐवजी एकमेकांचा अपमान करतात, एखाद्याचा जीव जात असेल तरी मदतीचा हात पुढे करत नाही. अशा परिस्थितीमध्ये माणुसकी लोप पावत चालली आहे. पण अजूनही काही लोक आहे ज्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक आहेत. असेही काही लोक आहेत जे फक्त माणसांबरोबर नाही तर प्राण्यांबरोबरही आदराने वागतात. याचीची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
माणसुकीची झलक दाखवणाऱ्या या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्र्याचे पिल्लू रेल्वे रुळावर अडकलेले दिसत आहे. ते पिल्लू कसे तरी रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मच्या बाजूला येते पण छोट्या उंचीमुळे त्याला उ़डी मारून प्लॅटफॉर्मवर चढता येत नाही. तो बराच वेळ वर चढण्याटचा प्रयत्न करो. प्लॅटफॉर्मवर अनेक लोक उभे आहेत पण कोणीही त्याच्या मदतीला येत नाही. तो बराच वेळ जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो अखेर एका व्यक्तीला त्याची दया येते आणि तो त्याची मदत करतो. कुत्र्याच्या पिल्ला उचलून अलगदपणे प्लॅटफॉर्म ठेवतो आणि निघून जातो. हा सर्व प्रकार कोणीतरी व्हिडीओमध्ये कैद केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले आहे. व्हिडिओ इंस्टाग्रामवरmarathi_epic_jokes पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
एकाने कमेंट केली की,” खुप माणसं होती तिथं ,पण माणुसकी एका जवळच होती.”
तर दुसरा म्हणाला की, “काय कामाची माणुसकी जर मुक्या जनावरांना समजू शकत नाही”
तिसरा म्हणाला की,”समोरचा माणूस नुसता ठोंब्या सारखा बघतोय पण त्या पिल्लाला वर उचलून नाही घेत.”