सावजाचा जीव जाईपर्यंत पिळ द्यायचा आणि मग त्याला अख्ख गिळायचे ही अजगराची शिकार करण्याचा पद्धत. त्यामुळे तो त्याचपेक्षाही दुप्पट आकाराच्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो आणि ते अन्न पचवूही शकतो. अजगराचा जबडा जरी लहान असला तरी पक्षी, सश्यापासून हरिणापर्यंत प्राणी देखील तो सहज गिळू शकतो. पण गीरच्या जंगलातील अजगराला मात्र सावज गिळणे चांगलेच महागात पडले. गुजरातमधली गीर हे जंगल जसे सिंहासाठी प्रसिद्ध आहे तसे विविध प्राणी आणि पक्ष्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. यातल्या एका अजगराने निल गायीची शिकार केली.
या अजगराने नील गायीला अख्खे गिळण्याचा प्रयत्न केला त्यात त्याला यशही आले पण नंतर मात्र त्याची प्रकृती खराब झाल्याची माहिती गीरच्या वनविभागाकडे आली. या माहितीनंतर त्वरित वनविभागाचे काही अधिकारी आले आणि या अजगराला पिंज-यात टाकून उपचारासाठी घेऊन गेले. या अजगराची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात येणार आहे. वीस फुट लांब असलेल्या या अजगराने नील गायीला गिळले पण नंतर मात्र कितीतरी वेळ हा अजगर तसाच पडून होता याची माहिती वनधिका-यांना मिळाल्यानंतर त्यांनी अजगराला सुरक्षित स्थळी नेले.