Viral Video: सोशल मीडियामुळे सतत विविध गाणी व्हायरल होताना आपण पाहतो. त्यातील काही गाणी नवीन, तर काही जुनी गाणीदेखील असतात. रील्समुळे गाणी चर्चेत येण्याचे प्रमाण वाढले आहे. इतर भाषांतील गाण्यांप्रमाणेच मराठी गाण्यांचीही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अगदी आताच्या गुलाबी साडी, बहरला मधुमास, आप्पाचा विषय हार्ड आणि तांबडी चामडी अशा अनेक नवीन गाण्यांनी लोकांना भुरळ घातली आहे. त्यावर मराठी युजर्ससह बॉलीवूडमधील कलाकार, परदेशांतील लोकही थिरकताना दिसतात. दरम्यान, आता पांडू या मराठी चित्रपटातील बुरूम बुरूम या लोकप्रिय गाण्यावर एक चिमुकली अभिनय करताना दिसतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजकालच्या अनेक लहान मुलांना अभिनय, नृत्य या क्षेत्रांत आपलं नाव मोठं करायचं आहे. रील्समुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पूर्वी लहान मुलांना मोठेपणी तुम्ही काय होणार, हे विचारल्यावर मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलिस अशी उत्तरं द्यायची. पण, हल्लीची मुलं आम्हा अभिनेत्री किंवा रील्स स्टार, यूट्यूबर व्हायचंय, असं सांगतात. सोशल मीडियावर लहान मुलांच्या अभिनयाचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गोड निरागस मुलगी बाईकवरून प्रवास करीत आहे. यावेळी ती चालू बाईकवर आई-बाबांमध्ये बसून, ती बुरूम बुरूम या गाण्यावर अभिनय करीत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावदेखील पाहण्यासारखे होते. प्रत्येक वाक्याला चिमुकली सुंदर आणि वेगवेगळी एक्स्प्रेशन्स देत होती. या मुलीचा हा गोड व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘शेवटी त्यानं मृत्यूला हरवलं…’ लांडग्याने युक्तीने करून घेतली कुत्र्याच्या तावडीतून सुटका; VIDEO पाहून व्हाल थक्क

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @avanti_sanap_754 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास दीड लाखाहून अधिक व्ह्युज आणि नऊ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “अशीच अ‍ॅक्टिंग करीत राहिलीस, तर खूप दूर जाशील बाळा.” दुसऱ्या युजरने लिहिलंय, “मी तर कितीतरी वेळा पाहिला तुझा हा व्हिडीओ; पण मन भरतच नाही.” तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “परत परत बघावा असा आहे हा व्हिडीओ.” आणखी एकानं लिहिलंय, “व्वा! खूपच सुंदर व्हिडीओ.”