रविवार, १८ सप्टेंबरला २५ कोटींची ओणम बंपर लॉटरी जिंकणारा केरळमधील ३० वर्षीय ऑटो-रिक्षा चालक के अनूपचा आनंद आता एका दुःखद स्वप्नात बदलला आहे. अनूपने फेसबुकवर एक निराशाजनक संदेश पोस्ट केला आहे. त्यात त्याने पहिल्याऐवजी पाच कोटी रुपयांचे दुसरे किंवा एक कोटी रुपयांचे तिसरे पारितोषिक जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला पहिले पारितोषिक मिळाले तेव्हा मी क्लाउड नाइनवर होतो. मी चमकणारे दिवे, स्पॉटलाइट आणि माझ्या आजूबाजूच्या हितचिंतकांची उपस्थिती अनुभवली. पण आता मला या प्रसिद्धीसाठी पैसे द्यावे लागत आहेत. मी माझ्या घरी जाऊ शकत नाही आणि माझ्या लहान मुलीसोबत खेळू शकत नाही आहे.” तो म्हणाला.

अनूप पुढे म्हणाला, “माझा विजय हा फ्लूक असल्याचे सांगून काही लोक अक्षरशः त्यांच्या वाट्याची मागणी करत आहेत आणि काहींनी मला धर्मादाय विषयावर लांबलचक व्याख्याने दिली. कंटाळून मी माझ्या नातेवाईकांच्या घरी दोनदा शिफ्ट झालो आहे. लोकांना माझी दुर्दशा समजायला हवी.”

हुंदके, डबडबलेले डोळे, प्रतिस्पर्ध्यालाही अश्रू अनावर… अलविदा Roger Federer! पाहा निवृत्तीच्या सामन्यातील भावूक क्षण

५०० रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी अनूपने शनिवारी संध्याकाळी आपल्या मुलीची पिगी बँक तोडली होती. २२ वर्षांच्या आपल्या वार्षिक विधीचा भाग म्हणून त्यांनी हे तिकीट खरेदी केले. शेफ म्हणून काम करण्यासाठी तो मलेशियाला जाण्याची योजना आखत होता आणि लॉटरीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच त्याचे कर्ज मंजूर झाले होते.

रविवारी लॉटरी जिंकल्यानंतर लगेचच अनूपने आपल्याला कर्जाची गरज नसल्याचे बँकेला सांगितले. तसेच, त्याने मलेशियाचा दौरा रद्द केल्याचेही सांगितले. केरळ लॉटरी विभागानुसार, कर आणि एजंटचे कमिशन वजा केल्यानंतर अनुपला सुमारे १६.२५ कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. लॉटरीची संपूर्ण रक्कम विजेत्याला हस्तांतरित करण्यासाठी साधारणपणे दोन आठवडे लागतात, असे राज्य लॉटरी विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rickshaw driver who won 25 crores in the lottery says i feel like should have got the second or third number not the first one pvp