आपण समुद्रातून जाणारा रस्ता पाहिला असेल. अभेद्य डोंगर पोखरून जाणारा महामार्ग पाहिला असेल. अगदी कडेकपारीसारख्या अवघड वळणावरून जाणाराही रस्ता पाहिला असेल, एवढंच कशाला पावसात तर मुंबईरांनी खड्डया खड्यांतूनही जाणारे रस्तेही पाहिले असतील. पण तुम्ही कधी पाच मजल्याच्या इमारतीवरून जाणारा रस्ता पाहिलात का? नाही ना? मग हे बघाच चीनमध्ये एका पाचमजली इमारतीच्या छातावरून चक्क रस्ता गेलाय. या रस्त्यावरून वाहनं धावतात. एवढंच कशाला रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार झाडं तर दुसऱ्या बाजूला खाण्या-पिण्यापासून ते कपड्यालत्त्यांची दुकानं देखील आहेत. कदाचित हे ऐकून तु्म्हाला विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे.

VIDEO: इथे ट्रेन प्रवाशांच्या घरी येते!

चीनमधल्या चोंगक्विंग शहरात हा रस्ता आहे. इथल्या पाच मजली इमारतीच्या छतावरून हा रस्ता जातो. या अनोख्या मार्गावरून वाहनांची तितकीच वर्दळ देखील असते. पण इथल्या वाहनांचा त्रास इमारतीतल्या लोकांना होऊ नये याची पुरेपुर काळजी येथे घेण्यात आलीय. इथल्या इंजिनिअर्सने अशा प्रकाराचं तंत्र विकसित केलं आहे. मुळात चीनमधलं चोंगक्विंग हे शहर आपल्या हटके तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. या शहराची लोकसंख्या प्रचंड आहे. तेव्हा इथे इमारतीही खूप आहेत. इथल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून इथल्या इंजिनिअर्सने इथे एकापेक्षा एक अशी सरस वाहतूक व्यवस्था निर्माण केलीय. या शहरातल्या एका इमारतीतून तर चक्क ट्रेनसुद्धा जाते. वेगळं असं रेल्वे स्टेशन उभारायला इथे जागा नाही तेव्हा रहिवासी राहत असेलल्या इमारतीतून रेल्वेमार्ग तयार करण्यात आलाय.