काही लोकांना अॅडवेंचर गेम्स खेळायला खूप आवडतात. असे गेम्स जे पाहून सर्वसामान्यांना चक्कर येईल. जगात अनेक साहसी लोक असतात. ज्यांना हटके आणि धाडसी गोष्टी करायला आवडतात. असं म्हणतात की अशा खेळांमुळे एक प्रकारची किक मिळते, अंगात एक वेगळीच उर्जा संचारते. सोशल मीडियावर अशाप्रकारे अॅडवेंचर व्हिडीओ वरचे वर व्हायरल होत असतात. तो एक प्रकारचा अविस्मरणीय अनुभव असतो असं म्हणा ना, मात्र हा अनुभव काही वेळेस जिवावर देखील बेततो. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेकदा अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील मोठमोठ्या राईड्सवर गंभीर अपघात होतात. काही वेळा मोठमोठे झोके अडकल्याचेही प्रकार समोर आले आहेत. दरम्यान अशीच एक घटना समोर आली आहे. एका थीम पार्कमध्ये रोलर कोस्टर राइड उंचावर जाताच तुटला आहे. यूकेतील साऊथटेंड थीम पार्कमधील ही धक्कादायक घटना आहे. पार्कमधील रोलर कोस्टवर लोक मजा लुटत होते. रोलर कोस्टर उंचावर गेला आणि तो तुटला. त्यानंतर तो वाकडा झाला. वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर असा झाला. यात बसलेले लोक हवेत लटकत होते. जीव मुठीत धरून सर्वजण बसले होते. माहितीनुसार तब्बल ४० मिनिटं लोक हवेत लटकत होते. यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं.

@SuppWarehouseUK ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार यात आठपेक्षा अधिक लोक होते. त्यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. सुदैवाने सर्वांना सुखरूप खाली उतरवण्यात आल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: १० वर्षांनी भेटला नवरा! पण ज्याला पती समजलं ‘तो’ निघाला भलताच कुणीतरी; नेमकं प्रकरण काय?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या पाळण्यात लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर बसतात, त्यामुळे पाळण्यांच्या सुरक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A roller coaster at southend theme park has broken down leaving riders stuck on the lift shocking video viral on social media srk
Show comments