Viral Video : आई आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. आई नेहमी मुलाच्या हिताचा विचार करते. मुलांच्या सुख दु:खासाठी ते वाट्टेत ते प्रयत्न करते. कधी मुलांना रागावते, त्यांच्याबरोबर भांडण करते, त्यांना मारते पण नेहमी मुलांचे चांगले व्हावे, हाच विचार ती नेहमी करते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आई आणि मुलीचा संवाद दाखवला आहे. जेव्हा मुलगी आईला ती डिप्रेशनमध्ये जात असल्याचे सांगते, तेव्हा तिची साधी भोळी आई काय म्हणते, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माय लेकीचा मजेशीर संवाद

या व्हिडीओमध्ये तुम्हाला आई आणि मुलीचा संवाद ऐकू येईल. हा संवाद हिंदीमध्ये आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुणी तिच्या आईला वैतागून सांगते की मी डिप्रेशनमध्ये जात आहे. तेव्हा आईने काय उत्तर द्यावं? पण या तरुणीच्या आईचे उत्तर ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. तिची आई तिला म्हणते, “कुठेही जायचं नाही. शांतपणे घरी बस. दिवसभर धावपळ करत बसते. पैसे आहे तुझ्याकडे फिरण्यासाठी” यावरून तुम्हाला कळेल की साध्या भोळी आईला डिप्रेशन हे एखादे ठिकाणाचे नाव वाटले. त्यावरून ती मुलीला म्हणते की कुठेही जाऊ नको. आईचे हे उत्तर ऐकून तरुणीला हसू आवरत नाही आणि ती जोरजोराने हसताना दिसते.

हेही वाचा : “संस्कार कमी पडले” नातवाने आजीला बॅटने मारलं; ‘ती’ फक्त रडत राहिली; काळीज पिळवटून टाकाणारा VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DATd3xrvzBg/?igsh=YWt5NDZrbHVsZ3Rn

हेही वाचा : “अशी भाऊबीज कधीही पाहिली नसेल!”, तरुणीने चक्क खारूताईला ओवाळले, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

azad_parinda84 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “डिप्रेशन गेले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सामान्य घरातील भारतीय आई” तर एका युजरने लिहिलेय, “आपण शेवटची पिढी आहोत ज्यांना आईकडून असे उत्तर मिळत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी आई तर म्हणते की एकटी जाऊ नको, पूर्ण कुटुंबाला घेऊन चल” एक युजर लिहितो, “आता या नंतर अशी साधीभोळी आई कोणालाही भेटणार नाही. आपण शेवटीची पिढी आहोत.