उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका दुकानदाराने एक दोन नव्हे तर तब्बल १२ किलो वजनाचा ‘बाहुबली समोसा’ तयार केला आहे. इतकेच नव्हे तर हा समोसा ३० मिनिटांत जो कोणी खाईल, त्याला ७१ हजार रुपयांचे बक्षीसदेखील दुकानदाराने जाहीर केलं आहे. त्यामुळे सध्या या समोशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. तर दुकानदाराने सांगितले की, अनेक लोक वाढदिवसानिमित्त हा समोसा मागवत असून केकप्रमाणे तो कापून वाढदिवस साजरा करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठच्या लालकुर्ती येथील कौशल स्वीट्समध्ये हा समोसा तयार करण्यात आला आहे. दुकानाचे मालक शुभम कौशल यांनी सांगितलं की, त्यांना समोशाशी संबंधित काहीतरी वेगळं करायचं होतं, यावेळी त्यांना १२ किलो वजनाचा ‘बाहुबली’ समोसा बनवण्याची कल्पना सुचली. ते पुढे म्हणाले, “लोक ‘बाहुबली’ समोसे ऑर्डर करतात आणि पारंपरिक पद्धतीने वाढदिवसाला केकऐवजी समोसा कापतात. हा समोसा बटाटे, मटार, मसाले, पनीर आणि ड्रायफ्रुट्सने भरलेला आहे. तर हा समोसा जो कोणी ३० मिनिटांत काईल त्याला ७१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.”

Fraud of 65 lakhs by two women, Fraud by women pune,
पुणे : दोन महिलांकडून ६५ लाखांची फसवणूक
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Viral video Elderly Couple In Karnataka Is Serving Unlimited Meals
५० रुपयांत पोटभर जेवण देणारे आजी-आजोबा; थरथरत्या हाताने ग्राहकांना वाढतात जेवण, पाहा प्रेमळ VIRAL VIDEO
man loses rs 90 Lakh after falling for lure of huge returns on share market investment
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ९० लाखांची फसवणूक
Navi Mumbai, cash stolen in five minutes,
नवी मुंबई : पाच मिनटांत अडीच लाखांची रोकड चोरी, पावती घेणे पडले महागात 
Cyber ​​thieves cheated people, Pune, Cyber ​​thieves,
पुणे : सायबर चोरट्यांकडून दोघांची ५७ लाखांची फसवणूक
In Thane two people were cheated by saying they would get more returns if they invested in stock market
ठाणे : शेअर बाजारातील गुतंवणूकीच्या माध्यमातून दोघांची लाखो रुपयांना फसवणूक
The price in the gold market in Delhi is Rs 77 thousand 850 print eco news
सोन्याला सार्वकालिक उच्चांकी झळाळी; दिल्लीतील सराफा बाजारपेठेत भाव ७७ हजार ८५० रुपयांवर

३ कामगारांनी सहा तासांत बनवला समोसा –

हेही पाहा- पत्ते खेळणाऱ्या मुलाची वडिलांनी चप्पलेने केली धुलाई; व्हायरल Video पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं झालं कठीण

“हा बाहुबली समोसा तयार करण्यासाठी दुकानातील तीन आचाऱ्यांना सुमारे ६ तासांचा वेळ लागतो. एका कढईत समोसे तळण्यासाठी ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो, तसेच बाहुबली समोसा सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाला आहे. यासोबतच अनेक फूड ब्लॉगर्सचे या समोसाने लक्ष वेधले आहे. त्यामुळे अनेकजण दुकानाला भेट देतात. आम्हाला स्थानिक लोकांकडून तसेच बाहेरून आलेल्या लोकांकडून ऑर्डर मिळतात. समोसा अॅडव्हान्स ऑर्डर दिल्यानंतरच डिलिव्हर केला जातो” असंही कौशल यांनी सांगितलं.

हेही पाहा- Video: झाडाला पाणी घालायला विसरलात तरीही रोप राहिल ताजे; ‘हा’ स्वस्त जुगाड पाहाच

किंमत दीड हजार –

कौशल यांनी सांगितले की, आम्ही ‘बाहुबली’ समोसा बनवायचे ठरवले यावेळी सुरुवातीला चार किलोचा आणि नंतर आठ किलोचा समोसा तयार केला. दोन्ही वजनाच्या समोशाला चांगलीच पसंती मिळाल्यानंतर १२ किलोचा समोसा तयार केला. तर या समोशाची किंमत दीड हजार रुपये आहे. तसेच या समोशाच्या आतापर्यंत ४० ते ५० ऑर्डर्स मिळाल्या असून तो देशातील सर्वात मोठा समोसा असल्याचा दावा देखील कौशल यांनी केला आहे.