काहींच्या सर्जनशिलतेला तोडच नसते. तुम्ही विचार देखील करू शकत नाही असे भन्नाट प्रकार आपल्याकडे होत असतात. आता हेच बघा ना बॉलीवूडमधील एखादे प्रसिद्ध गाणे तेही संस्कृतमध्ये आणि त्याच चालीत कोणी गायल्याचे तुमच्या ऐकिवात तरी आहे का?
नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. दिल्लीच्या पंकज झा या तरूणाने ‘धीरे धीरे मेरी झिंदगी मे आना’ हे गाणे चक्क संस्कृतमध्ये गायले आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. हनी सिंगने गायलेले सोनम कपूर, हृतिक रोशनचे हे गाणे चांगलेच हिट झाले आहे. पंकजने हेच गाणे संस्कृतमध्ये गायले आहे. या गाण्याचे संस्कृत बोल व्हिडिओमध्ये टाकून त्याने तो यु ट्युबवर अपलोड केला आहे.
पंकजने संस्कृतमध्ये पीएचडी केली आहे. नवी दिल्लीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

Story img Loader