आजकाल सोशल मीडियावर बॉस आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक मिम्स व्हायरल होत असतात. तर काही खरोखरं घडलेले किस्से देखील व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या बॉसच्या व्हाट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये पोहचायला उशीर झाल्यामुळे बॉसने त्याला विचारले उशीर का झाला? असं विचारलं. त्यावर या कर्मचाऱ्याने मजेत एक व्हायरल मिम बॉसला पाठवलं. त्या मिमवर बॉसने कर्मचाऱ्याला जो भन्नाट रिप्लाय दिला आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होत असलेल्या व्हाट्सअ‍ॅप स्क्रीनशॉटमध्ये आपण पाहू शकतो की, बॉसने कर्मचाऱ्याला “तु आतापर्यंत लॉग इन का केले नाही, काय झालेलं?” असे विचारल्याचं दिसत आहे. यावर कर्मचाऱ्याने एक मिम बॉसला शेअर केलं, ज्यामध्ये गोपी बहू लॅपटॉप धुताना दिसत आहे. शिवाय त्याने या मिम खाली सॉरी सर असंही लिहिल्याचं दिसत आहे. यानंतर बॉसने लिहिलं, “मी तुमच्या पगारवाढीच्या स्वप्नांवर देखील असेच पाणी ओतेन” बॉसने पाठवलेला हा रिप्लाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा- अधिकाऱ्याची पार्टी शेतकऱ्यांचे हाल; धरणात पडलेल्या मोबाईलसाठी २१ लाख लिटर पाणी घालवलं वाया

हेही पाहा- रस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल

व्हायरल होत असलेला फोटो @Ujjwal_athrav नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय त्याने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये, सोमवार अधिक वाईट होत चालला आहे, असं लिहिलं आहे. आतापर्यंत या ट्विटला ३८ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि बाराशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट देखील केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, बॉस खूप मजेदार आहे. तर दुसऱ्याने. बॉसने बरोबर कर्मचाऱ्याचा गेम केल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A screenshot of a whatsapp chat between an employee and his boss is going viral on social media jap