जातिवाद, सामाजिक विषमता आणि आर्थिक वर्गवारी या गोष्टी भारतीयांसाठी नवीन नाही. जात-पात, धर्म, वर्ग किंवा व्यावसाय यावरुन आजही समाजामध्ये भेदभव दिसून येतो. युपीतील वाराणसी येथील एका सोसायटीमध्ये याचा प्रत्यय आला. युपीमध्ये गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील गुन्हेगारीचा आलेख चढताच राहिला आहे. अशातच पुन्हा एकदा एका तरुणाने सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.याचा व्हिडीओ सध्या सोशल मडियावर व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरक्षा रक्षकाला हा तरुण मारत आहे. मात्र याचं कारण कळलं तर तुम्हीही संताप व्यक्त कराल. या सुरक्षा रक्षकाने तरुणाला तुम्ही कोण असं विचारलं म्हणून मारहाण केली आहे. यावर सुरक्षा रक्षक सांगत आहे की, हे माझं काम आहे. तरीही हा तरुण सुरक्षा रक्षकाला मारतच आहे. यावेळी तिथे उपस्थित असेलेल्या एकानं हा व्हिडीओ काढला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> एकावं ते नवलच…! या हॉटेलमध्ये लोक मार खायचे देतात पैसे; जपानमधल्या अजब हॉटेलचा VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत. नेटकऱ्यांनीही यावर टीका केली असून संतापजनक प्रतिक्रिया पोस्टवर केल्या आहेत. उच्चभ्रू वृत्तीचा निषेध असून असे वर्तन बंद करण्याचे आवाहन केले आहे.