सध्या सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे कधी आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही आपल्या अंगावर शहारे आणणारे असतात. सध्या असाच एका चहा विक्रेत्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर अनेक चहाचे दुकानदार ग्राहकांना चहा देताना खूप काळजी घेतील यात शंका नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्यापैकी अनेकजण चहाचे शौकीन असतील, ज्यांना चहा पिल्याशिवाय करमत नाही किंवा कामात मन लागत नाही. त्यामुळेच आता शहरांमध्ये दिवसेंदिवस चहा विक्रेत्यांची सख्या वाढताना दिसतं आहे. कारण तेवढा चहाचा खपही होत आहे. थंडीच्या दिवसात तर चहाची मागणी आणखी वाढते. अशा स्थितीत अनेक जण प्लास्टिकच्या पिशव्यांतून चहा पार्सल घेऊन जाताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चहा विक्रेता प्लॅस्टिकच्या पिशवीत अनोख्या पद्धतीने चहा पॅक करताना तो दिसत आहे. पण या व्हिडीओत पुढच्याच क्षणी असं काही होतं जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही पाहा- माणूस आहे की बाहुबली? तरुणाने एकाचवेळी उचलल्या दोन बाईक, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हिडिओमध्ये एक चहा विक्रेता अनोख्या पद्धतीने चहा विकताना आणि पॅकिंग करताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक चहा विक्रेता ग्राहकांसाठी प्लास्टिकच्या पिशवीत गरम चहा पॅक करताना दिसत आहे, चहाच्या उष्णतेमुळे प्लास्टिकची पिशवी फुटते त्यामुळे सर्व चहा पॅकींग करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर आणि हातावर पडल्याचं व्हिडीओमध्ये आहे. शिवाय व्हिडिओमध्ये ती व्यक्ती कपड्याने चेहरा पुसताना दिसत आहे. घटनेचा हा सर्व थरार चहा विक्रेत्याच्या गाड्याशेजारी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही पाहा- मच्छीमारांना पाण्यात सापडलं खेळणं, बादलीत टाकल्यावर मात्र निघाला दुर्मिळ जीव, जाणून घ्या यामागचं रहस्य

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @NarendraNeer007 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही चहा विकण्याची कोणती पद्धत आहे, भविष्यात चहा विकताना काळजी घ्या, नाहीतर एखाद्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A shocking video of a tea seller packing tea in hot plastic bags has gone viral jap