सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय काही व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून आपणालाही अनेक थरारक आणि कधीही न पाहिलेल्या अनोख्या गोष्टी पाहायला मिळतात. सध्या अशाच एका तरुणाच्या अनोख्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होत आहे.
आजपर्यंत तुम्ही रस्त्यावरुन भरधाव वेगाने बाईक चालविणाऱ्या तरुणांना, तर कधी खोल विहिरीत, किंवा डोंगर माथ्यावर अनोखे स्टंट करणाऱ्या बाइकस्वारांना पाहिले असेल, पण कधी एखाद्या व्यक्तीला नदीत बाईक चालवताना पाहिले आहे का? नसेल तर आज तुम्हाला ते देखील पाहायला मिळणार आहे. हो कारण सध्या एका तरुणाने नदीतून बाईक चालवल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून अनेकांनी असं धोकादायक कृत्य न करण्याचा सल्ला बाईकस्वारांना दिला आहे.
नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये –
व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुण पुलावरून नदी ओलांडण्याऐवजी थेट नदीमध्ये बाईक घालताना दिसत आहे. शिवाय तो अगदी सामान्य पद्धतीने आपण रस्त्यावर गाडी चालवतो त्याप्रमाणे नदीतून गाडी चालवताना व्हिडीओत दिसत आहे. व्हिडिओतील व्यक्ती बाईकवर बसून उतारावरून नदीकडे जाताना त्यानंतर तो नदीत पुढे जाताना काही वेळाने त्याची बाईक जास्त पाण्यात गेल्याचंही दिसत आहे. अनेकदा तो आता पाण्यात पडतो की काय असं व्हिडीओ पाहताना वाटत आहे. पण असं काहीही होत नाही आणि बाईकस्वार अत्यंत हुशारीने आपली बाईक पाण्यातून बाहेर काढतो.
अनोख्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल –
या अनोख्या स्टंटचा व्हिडिओ Motor Octane नावाच्या ट्विटर अकाऊंटवरन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती त्याची बाईक नदीत घालतो आणि भरधाव वेगात नदीपार करतो. या तरुणाच्या अनोख्या स्टंटचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘इच्छा तिथे मार्ग’ याचं उदाहरण. दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा जीवघेणा स्टंट असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.