Viral Photo Shows shopkeeper put board outside the shop : अनेकदा दुकानात गेल्यावर नक्की कोणत्या फ्लेवरचं चिप्स पाकीट घ्यायचं, हा प्रश्न आपल्यातील सगळ्यांनाच पडतो. दुकानात गेल्यावर स्टॅण्डवर लावून ठेवलेली किंवा दुकानात टांगून ठेवलेली चिप्सची पाकिटं पाहून कोणतं पाकीट विकत घ्यायचं हे तिथेच उभं राहून आपण ठरवायला सुरुवात करतो. अशा वेळी काही तापट स्वभावाचे दुकानदार आपल्याला ‘लवकर काय हवं ते सांग, मागे इतर ग्राहकसुद्धा उभे आहेत’, असेही म्हणतात. तर आज यावर उपाय म्हणून कोणताही संताप व्यक्त न करता, एका दुकानदारानं अजब मार्ग शोधून काढला आहे.

एक दुकानदार त्याच्या दुकानासमोर येणाऱ्या ग्राहकांमुळे कंटाळलेला दिसतो आहे. कारण- त्याच्या काही ग्राहकांचा नेमकं कोणतं चिप्सचे पॅकेट खरेदी करायचं हे ठरविताना गोंधळ होतो. त्यामुळे त्यानं हे प्रकरण मजेशीर पद्धतीनं हाताळायचं ठरवलं. त्यानं एका स्टॅण्डमध्ये लेस कंपनीची चिप्सची पाकिटं ठेवली आहेत आणि एक बोर्ड (Photo) चिकटवला आहे. बोर्डवर लेस कंपनीच्या चिप्सच्या वेगवेगळ्या चार पाकिटांचं चित्र आहे आणि मधोमध एक मजकूर लिहिला आहे. नक्की काय लिहिलं आहे ते या पोस्टमधून (Photo) तुम्हीसुद्धा नक्की बघा…

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
Boy hold poster of fathers love in front of school video goes viral
VIDEO: शाळेबाहेर तरुणानं झळकवली अशी पाटी की लहान मुलेही थांबून विचार करायला लागली; पाटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा
The young women who boarded the AC local without tickets were released by the TC know the reason behind
“एसी लोकलमध्ये दिसली माणुसकी” पोलीस भरतीसाठी आलेल्या दोन तरुणींचा VIDEO होतोय व्हायरल
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत

हेही वाचा… काय सांगता? ट्रेन, बसमध्ये नाही, तर व्यक्ती झोपली थेट रेल्वे रुळांवर; छत्री डोक्यावर घेतली अन्… पाहा मजेशीर VIDEO

पोस्ट नक्की बघा…

कृपया घरूनच नीट विचार करून या :

व्हायरल पोस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, दुकानदाराने चिप्स स्टॅण्डच्या बाहेर बोर्ड ( Photo )लावला आहे, “दुकान पर खडे होके ‘कोनसा लेस लू’ ये सोचना मना है. कृपया अपने घर से सोच के आये- शर्मा जनरल स्टोअर” म्हणजेच “दुकानात उभं राहून ‘मी कोणतं लेसचं पाकीट घेऊ’ असा विचार करण्यास सक्त मनाई आहे. कृपया घरूनच नीट विचार करून या” – असे या पोस्टवर लिहिलं आहे. त्यामुळे दुकानदाराच्या या अनोख्या कल्पनेचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट (Photo) Reddit ॲपवरून @nishantatripathi या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. दुकानदाराच्या या विनोदी अन् कल्पकतेचं प्रदर्शन करणारी ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे युजर्ससुद्धा मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, मी माझ्या करिअरची निवड करण्यापेक्षा लेस फ्लेवर निवडण्यात जास्त वेळ घालवला आहे.” दुसरा युजर म्हणतोय, “भारतीय दुकानदारांची त्यांच्या ग्राहकांशी संवाद साधण्याची स्टाईल.” तिसरा म्हणतोय की, ब्ल्यू, ग्रीन, डार्क ग्रीन लेस (चिप्स) पाकिटे विकत घेण्यात मी नेहमी गोंधळलेला असतो आदी कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.