Viral Video : देशभरातून अनेक लोक श्री स्वामी समर्थ यांची पूजा करतात आणि त्यांना मानतात. अनेक लोकांची स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे. सोशल मीडियावर अनेक जण स्वामी समर्थांचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकलीने स्वामी समर्थासारखे बसून दाखवले आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहून थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली बेडवर झोपलेली असते तेव्हा तिची आई तिला विचारते, “स्वामी कसे बसतात?” तेव्हा ती चिमुकली चक्क स्वामीसारखे बसून दाखवते. व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. विशेष म्हणजे या चिमुकलीचे वय फक्त सहा महिने आहे. या व्हिडीओवरुन तुम्हाला कळेल की लहान मुलांची अवलोकन क्षमता किती उत्तम असते.

हेही वाचा : तहानलेल्या कावळ्याची गोष्ट तुम्ही पुस्तकात वाचली असेल, पण आता प्रत्यक्षात सुद्धा पाहा, चतुर कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल

darshana_shivlakshmi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “श्री स्वामी समर्थ…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर ‘श्री स्वामी समर्थ…’चा जयघोष केला आहे. काही युजर्सनी चिमुकलीचे कौतुक सुद्धा केले आहे.

Story img Loader