सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर ही बातमी वाचलीच पाहिजे. अलीकडच्या काळात आई वडील कामात व्यस्त असताना लहान मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. पालकांच्या व्यस्ततेमुळे मुलांकडे लक्ष दिले जात नसल्याने अनुचित प्रकार घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये स्टंट करताना चिमुकला उंचावरुन खाली कोसळला. या भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ६ वर्षाचा मुलगा स्टंट करताना उंचावरुन कोसळतो. चिमुकला झिप लाईनचं अॅडव्हेंचर करत आहे. त्याच्या मागून एक व्यक्तीही दिसत आहे. तो त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. हा स्टंट करताना पुढच्याच क्षणी नचिमुकल्याच्या अंगाभोवती गुंडाळलेली दोरी तुटते आणि चिमुकला ४० फूट खाली कोसळतो. हा चिमुकला इतक्या पटकन कोसळतो की त्या माणसाला त्याला वाचवण्यासाठी वेळ मिळत नाह. इतक्या लहान मुलाला एकटं हा भयानक स्टंट सोडणे अशाप्रकारे जीवावर बेतू शकते.
पाहा व्हिडीओ
मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने पालकांनी वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.