Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके धक्कादायक असतात की अंगावर काटा येतो. सध्या असाच एका लहान चिमुकलीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खेळता खेळता ही चिमुकली चक्क स्विमिंग पूलमध्ये पडल्याची ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली घराच्या अंगणात खेळत आहे. अंगणात स्विमिंग पूलच्या शेजारी ती खेळत आहे. अचानक ती स्विमिंग पूलकडे जाते आणि त्यात पाय टाकण्याचा प्रयत्न करते अन् क्षणातच स्विमिंग पूलमध्ये पडते तेव्हा काही अंतरावर असलेल्या चिमुकलीच्या भावाला ती दिसते आणि तो वडिलांना सांगतो. चिमुकली स्विमिंग पूलमध्ये पडल्याचे पाहताच वडील धावून येतात आणि तिला पाण्यातून बाहेर काढतात. अंगावर शहारा आणणारा हा व्हिडीओ आहे.
हेही वाचा : चिमुकलीला लिपस्टिक अन् नेलपॉलिशमधला फरक समजेना, पोरीने एकाच प्रोडक्टनं रंगवलं…; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल
motivationalmaharaj या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले, “जर तुमच्या घरी स्विमिंग पूल असेल तर लहान मुलांची कृपया काळजी घ्या” तर एका युजरने लिहिले, ” व्हिडीओ पाहताना माझ्या अंगावर काटा आला होता, खरंच धक्कादायक व्हिडीओ आहे” आणखी एका युजरने लिहिले, “देवाचे खूप खूप आभार, वडिलांनी वेळीच येऊन जीव वाचवला”