Car Crushed Child CCTV Footage Viral: लहान मुलांना सांभाळताना त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते कारण नजर हटेपर्यंत मुले काही ना काही उद्योग करतात. विशेषत: रस्त्यावरून चालताना पालकांना मुलांवर खूप लक्ष द्यावे लागते अन्यथा मुलांचा जीवावर बेतू शकते. असाच काहीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका ४ वर्षाच्या मुलाला कारने चिरडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटनेत सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याघटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल हो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये वडिलांच्या डोळ्यांसमोर चिमुकल्याला़ कारखाली चिरडल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ इतका भयानक आहे की तुम्ही विचलित होऊ शकता. व्हिडीओमध्ये दिसते की, वडील मोबाईलवर बोलत आहेत आणि चिमुकला मागून धावत येत आहे. त्याचवेळी एक इनोव्हा कार गेटमधून आत येते, अचानक तो लहान मुलगा कार समोर येतो आणि कारच्या चाका खाली सापडतो. कार त्याच्या अंगावरून जात असल्याचे दिसत आहे. लेकरांच्या अंगावर कार गेल्याचे पाहून वडील धावत येतात. कार थांबताच चिमुकल्याला उचलून घेतात. अपघातानंतर तिथे उपस्थित लोकही जमा होतात. चिमुकल्याला त्याच कारमध्ये बसून रुग्णायलयात घेऊन जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ नाशिक शहरातील असून एका हॉटेल एक्स्प्रेस इनच्या परिसरातील आहे. मृत मुलाचे नाव ध्रुव राजपूत असे आहे. चालकाविरोधात ध्रुवचे वडील अजित राजपूत (३७, उपेंद्रनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील एक्स्प्रेस इन हॉटेलच्या आवारात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. ध्रुवचे वडील हे ओला, उबर चे नोंदणीकृत चालक आहेत. बुधवारी सायंकाळी आपल्या ग्राहकाला सोडण्यासाठी मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदा या दोघांना बरोबर घेऊन हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये गेले होते. ग्राहकाला हॉटेलमध्ये सोडत असताना त्यांची दोन्ही मुले आवारात खेळत होती. त्याचवेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारातून वेगाने आतमध्ये आलेल्या मोटारीखाली ध्रुव सापडला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याचे सांगितले जाते. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी संशयित वाहन चालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.