Viral Video : सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा मानवी वस्तीत साप आढळतो. कुठेही लपून राहतो. मानवी वस्तीत चुकून आलेले साप कधी बागेत, कधी घराच्या अंगणातील झाडा झुडपांमध्ये तर कधी एखाद्या वस्तूंमध्ये लपून दिसतो. आजही अनेक ठिकाणी सापांची दहशत दिसून येते.सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साप चक्क हेल्मेटमध्ये लपून बसलेला दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका हेल्मेटमध्ये साप चक्क बसलेला दिसत आहे. व्हिडीओत लोकांचा आवाज येत आहे. लोकांची गर्दी पाहून साप भीतीपोटी आत बसलेला दिसत आहे. यापूर्वी सुद्धा हेल्मेटमध्ये साप सापडल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते.
हेल्मेट ही दैनंदिन जीवनातील गरजेची वस्तू आहे. दुचाकी चालवणारे आवर्जून सुरक्षेपोटी हेल्मेटचा वापर करतात. अशात हेल्मेट वापरताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हेल्मेट वापरण्यापूर्वी आतून नीट तपासावे.
हेही वाचा : सापाला अंडी देताना पाहिले का? पाहून अंगावर काटा येईल, VIDEO होतोय व्हायरल
d_shrestha10 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “सापाने आपले घर शोधले” तर एका युजरने लिहिलेय, “साप वाहतूक नियमांचे पालन करतोय” आणखी एका युजरने लिहिलेय, “काळजी घ्या”