Viral Video : सध्या देशभरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. सगळीकडे देवीचे गाणे, भजन, गरबा दाडिंयाचा आवाज ऐकू येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी घराबाहेर पडत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा त्याच्या वृद्ध आईला कडेवर घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढत आहे. देवीच्या दर्शनासाठी आईला कडेवर घेऊन जाणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
देवी ही जगाची जननी असते, आई, माता असते आणि जन्म देणारी आई ही देवीचे रुप असते. आई मुलांसाठी आयुष्यभर संघर्ष करते, काबाडकष्ट करते पण वृद्ध वयात याच आईची सेवा करणे, हे प्रत्येक मुलांचे कर्तव्य असते. आईची सेवा करणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मुलगा त्याच्या आईला कडेवर घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढत आहे. पुढे पायऱ्या चढल्यानंतर आई प्रेमाने या मुलाच्या गालावर पापा देते व त्याचा लाड करते. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांच्या त्यांच्या आईची आठवण येईन. या व्हिडीओवर लिहिलेय, “एका आईच्या दर्शनासाठी दुसऱ्या आईला कडेवर घेऊन जाणारा श्रावण बाळ”
पाहा व्हायरल व्हिडीओ
lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “असे सुख सर्वांच्याच नशिबी नसते !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माऊली खूप पुण्य आणि जगात कुठेही न भेटणारं सुख समाधान तुम्ही आज मिळवलयं. तुम्हाला माझा मानाचा मुजरा. जय शिवराय जय शंभुराजे. मी शिर्डीकर एक शिवभक्त” तर एका युजरने लिहिलेय, “दुसऱ्या आईला पाहण्यासाठी आपल्या आईला घेऊन जाताना” तर एका युजरने लिहिलेय, “त्या साठी भावांनो आई पाहिजे, आई नाही तर काही नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावाला सलाम” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.