१९९० च्या चित्रपट जुर्म मधील ‘जब कोई बात बिगड़ जाये’ गाणाऱ्या एका तरुणाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याचं बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कुणाल कपूरसह अनेकांनी कौतुक केले आहे. त्या तरुणाला टॅग करत लिहिले की, “जेव्हा टॅलेंट तंत्रज्ञानाला भेटते, तेव्हा शक्यता अंतहीन असतात.”
२.१० मिनिटांच्या व्हिडीमध्ये, शकील असं नाव असणारा तरुण संगीतकार, गिटार वाजवत गाणं गाताना दिसत आहे. त्याच्याभोवती एक छोटासा जमावही आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये दिसून येत की त्याच्या पुढे एक साइनबोर्ड आहे. त्या बोर्डवर अनेक ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म तसेच शकीलच्या मदतीसाठी योगदान देऊ इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी क्यूआर कोड आहे. संदेशात लिहिले आहे, “तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद, हे योगदान माझ्या म्युझिक स्कूलची फी भरेल.”
(हे ही वाचा: Video: चिमुरडीने वडिलांना पायलट म्हणून पाहिलं अन्…)
ऑनलाइन शेअर केल्यावर, हा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला आणि अभिनेता कुणाल कपूरने पुन्हा शेअर केला. त्याने लोकांना शकीलला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. “हुशार! तुम्ही जिथे असाल तेथून तुम्ही या अत्यंत प्रतिभावान आणि नाविन्यपूर्ण संगीतकाराला पाठिंबा देऊ शकता. यूपीआय आणि तंत्रज्ञानाची शक्ती, ”असे कपूर यांनी ट्विट केले. ही पोस्ट हृतिक रोशनने देखील रीट्वीट केली होती, जो शकीलच्या गायन कौशल्याने प्रभावित झाला होता.
व्हिडीओवर शकीलला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावून गेलेल्या, त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पुन्हा शेअर केली ज्याने व्हिडीओ शेअर करणाऱ्या वापरकर्त्याचे “त्याचे आयुष्य बदलल्याबद्दल” आभार मानले.
(हे ही वाचा: तुम्ही कधी चायनीज बिर्याणी ट्राय केली आहे का? पहा व्हायरल व्हिडीओ)
“व्हायरल व्हिडीओ ज्याने सर्वांचे लक्ष वेधले, @ankit.today सर, तुम्ही हे शेअर करून माझे आयुष्य अक्षरशः बदलले, मला प्रत्येकाला धन्यवाद द्यायचे आहे ज्यांनी मला कामगिरी करताना पाहिले, मला प्रोत्साहित केले आणि माझ्या कार्यात योगदान दिले, मी खूप आभारी आहे आणि कृतज्ञ आहे. मला जे आवडते ते करण्यात मी धन्य आहे. ”
“आजपर्यंत माझे पालक, कुटुंब किंवा माझे मित्र कोणालाही माहित नव्हते की मी काय करीत आहे. मी तुम्हाला सर्व सांगू इच्छितो की मी एक बसकर (स्ट्रीट परफॉर्मर) आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, शेवटी मला माझ्या ओळखीबद्दल जाहीरपणे बोलण्याचे धैर्य मिळाले. ”