हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबर अनेकदा आपण जेवायला जायचा प्लॅन करतो. हॉटेल असो किंवा घरचे जेवण काही जणांना तिखट खाण्याची सवय नसते. त्यामुळे हॉटेलमधील एखादा पदार्थ आवडला नाही, तर ‘आमचे पैसे परत द्या’, अशी मागणी काही ग्राहक करतात. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे; ज्यात तिखट न खाणाऱ्यांसाठी एक खास नोटीस हॉटेलकडून देण्यात आली आहे.
एका हॉटेलमध्ये एक खास नोटीस लावण्यात आली आहे. या नोटीसवर लिहिले आहे की, ‘स्पाइज लेव्हल वॉर्निंग’ लेव्हल . जेव्हा तुम्ही एखादा मसालेदार पदार्थ ऑर्डर करता आणि तो तिखट पदार्थ खाणे तुम्हाला शक्य होत नसेल, तर आम्ही तुमचे पैसे परत देणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे या नोटिशीमध्ये लिहिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी हॉटेलची ही पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.
हेही वाचा…आजीच्या हातची गरमागरम भाकरी खातोय माकड; आजी पुरवतेय नातवंडाप्रमाणे लाड, व्हिडीओ होतोय व्हायरल
पोस्ट नक्की बघा :
अनेक ग्राहक एखादा पदार्थ आवडला नाही की ते लगेच हॉटेलमधील वेटरला सांगून तो पदार्थ घेऊन जाण्यास सांगतात किंवा काही ग्राहक असे असतात की जे थेट त्यांचे पैसे परत मागतात. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी या हॉटेलने एक खास नोटीस तयार केली आणि पैसे परत मागणाऱ्या ग्राहकांना आवर्जून सांगितले की, जर तुम्ही एखादा मसालेदार पदार्थ ऑर्डर केला आणि तो पदार्थ तुम्हाला खायला जमले नाही, तर आम्ही तुमचे पैसे परत देणार नाही. ग्राहक हॉटेलमध्ये ऑर्डर देण्याआधी पदार्थांची योग्य ती निवड करतील हा याचा उद्देश असावा.
सोशल मीडियावर ही पोस्ट @NoContextBrits यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, तिखट नाही खाऊ शकत, तर ऑर्डरच नका करू. तर काही नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करीत आहेत. अनेक जण विविध हॉटेलचे अनुभव शेअर करताना कमेंटमध्ये दिसले आहेत. हॉटेलचे नाव या पोस्टमध्ये लिहिलेले नाही आहे. पण, सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.