सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात यामध्ये काही आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ असतात, तर काही हृदय पिळवटून टाकणारे असतात. या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओंध्ये अपघातांच्या व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सध्या असाच एक कार अघाताचा भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका कारचालकाच्या चुकीमुळे भरधाव कारने जागीच पेट घेतल्याच व्हिडीओत दिसत आहे.

वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घेतली नाही तर आपणाला कोणत्या संकटाला सामोरं जावं लागतं याचा प्रत्यय हा व्हिडीओ पाहिल्यावर येत आहे. आपण आपल्या कारमधून प्रवासाला बाहेर निघाल्यावर तो प्रवास कोणत्याही त्रासाशिवाय आणि दुर्घटना न होता व्हावा यासाठी आपणाला काही वाहतुकीचे नियम पाळणं गरजेचं असत. अनेकवेळा आपण ते पाळतोही, मात्र समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळेही कधी कधी आपणाला मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागतं. व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अशाच एका घटनेचा आहे.

Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Man Risks Life to Catch Running Train
VIDEO : जीव एवढा स्वस्त असतो का? धावती रेल्वे पकडण्यासाठी थेट रुळावर मारली उडी अन्.. नेटकरी म्हणाले, “जबाबदारी नाही तर मुर्खपणा आहे..”

हेही पाहा- Video: कारला रस्ता देण्यासाठी जेसीबी चालकाचं भलतंच धाडस, भररस्त्यात JCB वर उचलला अन्….

या अपघाताच्या व्हिडिओमध्ये, एका रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याचं दिसत आहे तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सिग्नल लागलेला दिसत आहे. अशातच सिग्नल लागलेल्या बाजूने एक भरधाव कार येते आणि थेट समोरच्या प्रमुख रस्त्यावर जिथे वाहनांची ये-जा सुरु आहे त्या वाहनांना जाऊन धडक देते. ही कार एवढ्या जोरात येते की क्षणात या कारने पेट घेतल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- Video: थंडीपासून बचाव करण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, अंगावर इतके कपडे घातले की मोजणाराही थक्क झाला

त्यामुळे हे कार चालवताना निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचं काहीजण म्हणत आहेत. तर अनेकांनी कारमध्ये तांत्रिक समस्या असल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे हा अपघात नक्की कशामुळे झाला याबाबतची माहिती समोर आलेली नाही. पण या अपघाताची दृश्य मात्र अनेकांना विचलीत करणारी आहेत

Story img Loader