Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल कारण या व्हिडीओमध्ये चक्क स्पायडरमॅन इस्त्री करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

स्पायडरमॅन हा लहान मुलांचा हिरो म्हणून ओळखला जातो. याच स्पायडरमॅनला जर या लहान मुलांनी इस्त्री करताना पाहिले तर? त्यांना वाटेल स्पायडरमॅन कपड्यांना इस्त्री कसा करणार? तर हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला हा व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Puneri pati viral
Photo: “कृपया आपला ‘मी’ पणा…” असा अपमान फक्त पुण्यातच! ही पुणेरी पाटी वाचून पोट धरुन हसाल
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
deposit slip column was Rashi in Hindi translation woman writes her Zodiac sign Libra in the amount column bank employees were shocked viral video
महिलेने बँकेत पैसे जमा करताना रकमेएवजी डिपॉझिट स्लिपवर लिहिले असे काही की… बँक कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का; पाहा VIDEO
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

हेही वाचा : पालक, प्रकल्प अन् विद्यार्थी! आईने VIDEO शेअर करत सांगितली ‘ती’ गोष्ट; शिक्षकांकडे केली अनोखी मागणी

पाहा व्हायल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका इस्त्री करणाऱ्याच्या गाड्यावर स्पायडरमॅन उभा आहे आणि तो चक्क इस्त्री करतोय. त्याला पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवला आहे आणि एक व्यक्ती स्पायडरमॅनची वेशभूषा घालून इस्त्री करतोय पण विचार करा जर लहान मुलांनी हा व्हिडीओ पाहिला तर त्यांना हाच प्रश्न पडेल की स्पायडरमॅन कपड्यांना इस्त्री का करतोय? सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : उत्तराखंडच्या धारचुलामध्ये भूस्खलनाचा थरार! मोठा खडक नदीत कोसळला, Viral Video पाहून अंगावर येईल शहारा

@BabaXwale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पोटासाठी स्पायडरमॅनला काय काय करावे लागते?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आज कमावणार तर उद्या खाणार” तर एका युजरने लिहिलेय, “स्पाडरमॅननी सुद्धा रोजंदारी करावी लागते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे पाहून आयरनमॅनला मोठा धक्का बसला”

स्पायडर मॅन हे मार्व्हेल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या चित्रकथांमधील एक काल्पनिक व्यक्तिमत्त्व आहे. या व्यक्तिमत्वावर आधारीत चित्रपट सुद्धा आला आहे. लहान मुलांना आवडणाऱ्या स्पायडरमॅन या व्यक्तिमत्त्वाने जगात खूप लोकप्रियता मिळवली.सोशल मीडियावर स्पायडरमॅनचे अनेक चाहते दिसून येतात. काही लोक स्पाडरमॅनवर मीम्स, व्हिडीओ बनवत असतात.