सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात जे दिसायला वेगळे आणि वास्तवात वेगळे असतात. असं होण्यामागचं कारण म्हणजे फोटो अनेकदा भ्रम निर्माण करतात ज्यामुळे आपणदेखील गोंधळून जातो. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेलच शिवाय विचार करायलाही भाग पाडेल यात शंका नाही.
अनेकदा आपण एखादा फोटो पहिल्यांदा पाहतो आणि त्यावर लगेच विश्वास ठेवतो, पण नंतर काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आपणाला त्या फोटोमागचे रहस्य समजतं. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भलामोठा दगड हवेत तरंगताना दिसत आहे, पण खरंतर असं काहीही घडलेलं नसून पाहणाऱ्यांना केवळ तसा भास होत आहे. तर हवेत तरंगताना दिसणाऱ्या फोटोमागचं वास्तव नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
हेही पाहा- एकाचवेळी २ सायकल पळवणाऱ्या व्यक्तीचा Video व्हायरल, अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क
खरंच दगड हवेत उडतोय?
व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात येणारा विचार ही बातमी वाचल्यनंतर बदलेल यात शंका नाही. तर हवेत तरंगणाऱ्या दगडाचा जो फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे, तो पाहून हे कसं होऊ शकतं? आणि असं होण्यामागचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी लोकांमध्ये खूप आतुरता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. फोटोच्या खाली जमीन दिसत असल्यामुळे दगड हवेत उडाल्यासारखा दिसत आहे, परंतु फोटोमागील वास्तव काहीतरी वेगळंच आहे. हा फोटो ट्विटरवर शेअर करणार्या मॅसिमो नावाचाच्या ट्विटरधारकाने फोटोखाली दिलेल्या कमेंटमध्ये या रहस्याचा उलघडा केला आहे.
हेही पाहा- Video: जीत का समंदर चुनौतियोंसे भरा है, देशाच्या रक्षणासाठी जवान बर्फाच्या वादळात तैनात
वास्तव समजताच थक्क झाले लोक –
हा फोटो कॅप्शनसह शेअर केला केला आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे, “हा फोटो एक उत्तम उदाहरण आहे की, ऑप्टिकल इल्युजन आपल्याला कशाप्रकारे आपल्या मनात भ्रम निर्माण करु शकते. या फोटोत तुम्हाला पहिल्यांदा एक दगड हवेत तरंगताना दिसतो आणि नंतर जेव्हा एखादा व्यक्ती तो फोटो पहिल्यांदा पाहतो तेव्हा कोणत्याही आधाराशिवाय हवेत तरंगणारा एक दगड दिसतो. पण खरंतर तो दगड पाण्यात असून त्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे तो तसा दिसत आहे. हवेत दिसत असला तरी पाण्यात तरंगणाऱ्या या दगडामागेच वास्तव समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.