Viral Video: प्रत्येक परिसरात रस्त्यावर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल दिसून येतात. त्यांची ती भन्नाट नावं, पदार्थ बनविण्याची स्टाईल, खास रचना स्टॉल्सच्या अशा या अनेक बाबी ग्राहकांना आकर्षित करतात. त्यामुळे या विक्रेत्यांचे व्हिडीओ युजर्स अनेकदा शेअर करून, त्यांच्यातील टॅलेंट जगासमोर आणतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका विक्रेत्याचं पराठा बनविण्याचं अनोखं कौशल्य पाहायला मिळालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दिल्लीतील आहे. सफदरजंग रुग्णालयाच्या गेट क्रमांक ६ जवळ एक फूड स्टॉल आहे. या फूड स्टॉलचे नाव ‘फ्लाइंग पराठा’, असे आहे. कारण- इथे फूड स्टॉलचा विक्रेता अनोख्या प्रकारे पराठे बनविताना दिसत आहे. पराठा विक्रेता सुरुवातीला पिठाचे गोळे करून ठेवतो आणि एकेक करून पराठे लाटून घेतो. तसेच हा विक्रेता लाटून घेतलेले पराठे दुरूनच एका मोठ्या तव्यावर उतरवतो. एकदा पाहाच विक्रेत्याची ही अनोखी शैली.

हेही वाचा…VIDEO: आजी-आजोबांचं नातं अन् लग्नाचा वाढदिवस; प्रेमकहाणी पाहून नातू म्हणाला, “मी या पिढीत…”

व्हिडीओ नक्की बघा :

तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, पराठे लाटून घेणारी आणि पराठा तव्यावर भाजणारी अशा दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. तर हा विक्रेता अगदीच कुशलतेनं लाटून घेतलेले पराठे थेट दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ असणाऱ्या मोठ्या तव्यावर फेकतो. म्हणजेच विक्रेत्यानं हवेत फेकलेला पराठा थेट तो तव्यावर जाऊन पडतो; जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल एवढं नक्की.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @desimojito या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘बेस्ट टॅलेंट’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून “व्वा! द फ्लाइंग पराठा”, “सराव माणसाला परिपूर्ण बनवतो” आदी अनेक कमेंट्स; तर अनेक जण विक्रेत्याच्या कौशल्याचे विविध शब्दांत कौतुक करताना दिसत आहेत.