Viral Video : आपल्या देशात जुगाड करणाऱ्या लोकांचा कमतरता नाही. सोशल मीडियावर आपण दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या जुगाडचे व्हिडीओ पाहत असतो. काही जुगाड मजेशीर असतात तर काही जुगाड थक्क करणारे असतात पण काही जुगाड अवाक् करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका विद्यार्थ्याने क्लासमध्ये फोन वापरण्यासाठी असे काही केले की तुमचा विश्वास बसणार नाही. त्याने चक्क कंपासपेटीमध्ये फोन लपवून आणला. सध्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मोबाईलचे खूप वेड लागले आहेत. ते एक मिनिटही मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत पण शाळेत फोन वापरण्यास परवानगी नसते. त्यामुळे एका मुलाने कंपासपेटीमध्ये फोन लवपून आणल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. (a student has hidden mobile in Compass Box)

विद्यार्थ्याने चक्क कंपासपेटीमध्ये लपवून आणला फोन

हा व्हायरल व्हिडीओ एका वर्गखोलीतील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला वर्गामध्ये विद्यार्थी दिसेल. काही विद्यार्थी गप्पा मारत आहे तर काही विद्यार्थी चर्चा करत आहे. काही बाकावर विद्यार्थी अभ्यास करत आहे. एका बाकावर दोन विद्यार्थी बसलेले दिसतात. त्यातील एका विद्यार्थ्याच्या हातात कंपास पेटी असते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या विद्यार्थ्याने कंपासपेटीमध्ये फोन आणलेला आहे आणि विद्यार्थी फोनमध्ये गेम खेळत आहे. शेजारी बसलेला मुलगा त्याच्या मोबाईलमध्ये बघत आहे. अचानक त्या विद्यार्थ्याला दिसते की कोणीतरी त्याला कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहे, तेव्हा तो लगेच कंपास पेटी बंद करतो आणि जागेवरून उठतो. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. शाळेत फोन वापरण्यास मनाई असते पण फोन वापरण्यासाठी या विद्यार्थ्याने चक्क कंपासपेटी मध्ये फोन लपवून आणला.

groom kicks his friend in weeding bride gets scared
असला नवरा नको रे बाबा! भरलग्नात नवरदेवाने मित्राला मारली लाथ, वधू घाबरली; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “अरे हा वेडा…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
chappal at modi car video
Video: पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल, व्हिडीओ व्हायरल; कार पुढे येताच सुरक्षा रक्षकाने…
DCM Ajit Pawar
सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर ४८ तासांच्या आत अजित पवारांचा मोठा निर्णय, युगेंद्र पवारांना पहिला झटका
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!

हेही वाचा : Photo: प्रत्येक मुलाचं स्वप्न…; आयपीएस मनोज शर्मां यांनी आईसोबत केला विमान प्रवास; फोटोखालच्या ओळी वाचून व्हाल भावूक

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ३४ कोटींचा जॅकपॉट लागताच हर्षवायूमुळे आला हृदयविकाराचा झटका, सिंगापूरच्या कॅसिनोतला व्हिडीओ व्हायरल

last.opinions या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नवीन फोन कव्हर” तर एका युजरने लिहिलेय, “मी हा जुगाड दोन वर्षापूर्वीच केला होता” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा जुगाड भारताबाहेर जायला नको” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.