Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांचे जुने दिवस आठवतात तर काही लोकांना शाळा कॉलेजातील किस्से आठवतात. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून अनेक जण भावुक होतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शाळेत न जाता घरी टिव्ही बघणाऱ्या मुलाच्या घरी अचानक त्याचे शाळेतील शिक्षक येतात आणि पुढे जे काही घडते ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या शालेय जीवनातील गमती जमती आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (A student Missed school for two days and watching tv at home)

Couple dance video husband wife dance in wedding on marathi song
VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Little boy making bhakri mothers discipline viral video on social media
शेवटी आईचे संस्कार! चिमुकल्याने लहान वयातच असं करून दाखवलं जे आज मोठ्यांनाही जमत नाही, प्रत्येक मुलाने बघावा असा VIDEO
When The teacher asked students for homework students told hilarious reason
“गृहपाठ का केला नाही?” विद्यार्थ्यांनी दिलेली कारणं ऐकून आठवेल तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस, मजेशीर VIDEO व्हायरल
Dad and daughter dance
“गोरी गौरी मांडवाखाली…”, हळदीमध्ये बाप-लेकीचा धिंगाना! अफलातून डान्स Video होतोय Viramu
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
shocking viral video
स्मशानभूमीतील थरकाप उडवणारा VIDEO, जळत्या चितेवर तरुणानं केलं असं काही की…; पाहून तुम्हालाही भरेल धडकी
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

काय होत आहे व्हायरल?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मुलगा घरी बेडवर आराम करत टिव्ही बघताना दिसेल. तितक्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत त्याचे शिक्षक त्याच्या समोर येतात. या दरम्यान व्हिडीओमध्ये एका महिलेचा सुद्धा आवाज येतो आणि ती म्हणते, “तो शाळेच्या गेटवरून परत आला” त्यानंतर या मुलाचे शिक्षक त्याला दोन दिवस शाळेत न येण्याचे कारण विचारतात. मुलगा हळू आवाजात कारण सांगतो. त्यानंतर शिक्षक त्याला लगेच शाळेत जाण्यासाठी तयार होण्यास सांगतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : ‘माझ्या कॅब ड्रायव्हरचा ड्रायव्हर…’चालकाला झोप आवरेना, मग प्रवाशाने केली ‘अशी’ मदत; पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” दोन दिवस शाळेत न गेल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घरी घेतली धाव”

हेही वाचा : लढाई अस्तित्वाची! एका माशासाठी अवकाशात रंगले थरारक युद्ध; घारीने मारली चोच तर बगळ्याचा पलटवार, पाहा शेवटी कोणी मारली बाजी?

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी शिक्षक इतके जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, हे पाहून बरे वाटले. आजकाल, हे असे दिसून येत नाही. अनेक जण शाळेला व्यवसाय समजतात.” तर एका युजरने लिहिलेय, ” खूप जबाबदार शिक्षक भेटला या विद्यार्थ्याला” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे शिक्षक भेटले, नशीबवान आहे हा मुलगा” एक युजर लिहितो, “अशा शिक्षकांची आपल्या देशाला खूप जास्त गरज आहे.” तर एक युजर लिहितो, “माझ्या बरोबर सुद्धा एकदा असेच घडले होते” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून शिक्षकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader