जगभरातील विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये नेहमीच अनोख्या रेकॉर्डसची नोंद होत असते. जास्तीत जास्त नारळ फोडणे, सर्वाधिक दात असणे, चेंडूचा सगळ्यात उंच झेल, पाण्याखाली जादू दाखवणे, तीन तास बर्फात उभं राहणे, जास्तीत जास्त बर्गर खाणे आदी अनेक विक्रम यात नोंदवण्यात आले आहेत. तर आता या पुस्तकात एका अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. यामध्ये एका व्यक्तीने खेळण्यातील (Toy Car ) कारचा उपयोग करून गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव कोरलं आहे.
आतापर्यंत तुम्ही बाईक, सायकल, कारवर स्वार होणारे अनेक चालक पाहिले असतील. पण, जर्मनीतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी मार्सेल पॉलने एका छोट्या इलेक्ट्रिक खेळण्यातील (टॉय कारचा) कारवर स्वार होऊन विश्वविक्रम नोंदवला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, व्यक्ती सुरुवातीला इलेक्ट्रिक कार सेट करून घेतो. त्यानंतर ही छोटीशी कार स्टार्ट करतो आणि जवळजवळ झोपून ही कार पूर्ण मैदानात चालवतो. एकदा पाहाच हा अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड.
हेही वाचा…मानलं राव! गाड्या एकमेकांना धडकू नयेत म्हणून तरुणीचा हटके जुगाड; गाडीला लावली बाटली अन्… पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
खेळण्यातील ही इलेक्ट्रिक कार चालवून व्यक्तीने ‘फास्टेस्ट राइड-ऑन टॉय कार’ हा किताब पटकावला आहे. रायडिंगसाठी खेळातील इलेक्ट्रिक कारचा उपयोग केल्याने व्यक्तीची गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे. तसेच यादरम्यान मार्सेल पॉलची सर्वात वेगवान राइड १४८.४५४ किमी/ता (९२.२४ mph) नोंदवण्यात आली आहे; असे कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मार्सेल पॉल हे मूळचे जर्मनीचे असून फुलदा युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेसमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. हा प्रयोग करण्यापूर्वी त्यांनी दहा महिने संशोधन आणि सराव केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांच्या @guinnessworldrecords या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे