Viral Video : अनेकदा आपल्या अत्यंत प्रिय वस्तू हरवतात तेव्हा आपण खूप शोधण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा त्या वस्तू सापडतात तर काही व्हिडीओ शोधूनही सापडत नाही आणि मग आपण विसरून जातो मग अनेक वर्षानंतर आपल्याला त्या वस्तू दिसतात तेव्हा आपला आनंद गगनात मावेनासा असतो. (a students purse lost in 1957 and found after 63 years)

सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थीनीची हरवलेली पर्स चक्क ६३ वर्षानंतर तिच्या शाळेत सापडली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय. एखादी वस्तू १० वर्षानंतर किंवा २० वर्षांनंतर सापडली तरी आपला विश्वास बसत नाही पण या विद्यार्थीनीची शाळेत हरवलेली पर्स चक्क ६३ वर्षानंतर सापडली. या पर्समध्ये कोणत्या वस्तू होत्या, हे या व्हिडीओमध्ये दाखवल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला शाळेच्या आत भिंती शेजारी एक जुनी लाल रंगाची पर्स दिसेल. ही पर्स जेव्हा उघडली तेव्हा ती ६३ वर्ष जुनी पर्स असल्याचे समोर आले. ही पर्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. १९५७ मध्ये पॅट्टी रमफोला नावाच्या एका विद्यार्थीनीची लाल रंगाची पर्स हरवली होती. ही पर्स ६३ वर्षानंतर सापडली. या पर्समध्ये काही वस्तू सापडल्या. त्यात कंगवा, पावडर, लिपस्टिक, मेकअपचे सामान सापडले. कुटुंबातील लोकांचे आणि मित्रांचे फोटो सुद्धा त्यात होते आणि काही कागदपत्रे आणि महत्त्वाचे शालेय ओळखपत्र त्यात होती.

हेही वाचा : लोकांनी ट्रोल केले; पण तो ठरला फायनलचा हीरो! बालपणीचा खास VIDEO शेअर करीत भावूक झाला हार्दिक; असा होता पांड्याचा प्रवा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : सिंहाचा जीव धोक्यात; पाणघोड्याचा सिंहाच्या कळपावर हल्ला; थरकाप उडविणारा VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “जंगलाचा खरा राजा…”

insidehistory या इन्स्टाग्राम अकाउटंवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” त्यावेळी फेसबुक नव्हते, टिकटॉक नव्हते, स्मार्टफोन नव्हते… मुले आनंदी होती. ते बालपण आतापेक्षा चांगले होते. ” तर एका युजरने लिहिलेय, “१९५०च्या दशकातील विद्यार्थी किती निष्पाप होते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हस्ताक्षर पाहा. आजकालची मुले असे हस्ताक्षर काढू शकत नाही.”