Video Viral : असं म्हणतात, आपल्या देशात टॅलेंटची कमी नाही. सोशल मीडियावर तर अनेक लोकांचे टॅलेंट दिसून येते. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो, कधी कोणी हटके जुगाड सांगताना दिसतो तर कधी कोणी अवाक् करणारे स्टंट करताना दिसतो. काही लोक त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या किंवा अचंबित करणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चहाची टपरी दिसेल. या टपरीवर चहा विक्रेता चहा बनवताना दिसतोय आणि चहा बनवताना तो खूप सुंदर आवाजात गाणं गाताना दिसतोय. त्याचा आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आणि क्षणभरात त्याचे चाहते व्हाल. या टॅलेंटेड चहावाल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. (a tea seller from gujarat sings amazing song video goes viral)
चहापेक्षा कडक गातोय चहा विक्रेता (a tea seller sings amazing song)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चहाची टपरी दिसेल. या टपरीवर तुम्हाला एक चहाविक्रेता चहा बनवताना दिसेल. त्याच्या एका हातात माईक आहे आणि तो माईकवर सुंदर गाणं गाताना दिसतोय. त्याचं गाणं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. “तेरे जैसे यार कहा, कहा ऐसा याराना” हे लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहे. त्याचा सुमधुर आवाज ऐकून तुम्ही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. चहाबरोबर तो लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “खरे टॅलेंट, व्हिडीओ भरपूर शेअर करा जेणेकरून या व्यक्तीला मोठ्या स्टेजवर संधी मिळेन. भावनगर गुजरात”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
hello_bhavnagar._ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सहकार्य करा.”
हेही वाचा : “भाकरी बनवणारा नवरा भेटायला नशीब लागतं” बायकोसाठी बनवली अशी भाकरी की VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा खूश राहा. एकदिवशी तु पंतप्रधान होणार. चहावाले पंतप्रधान बनतात.” तर एका युजरने लिहिलेय, “काय टॅलेंट आहे” अनेक युजर्सनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.