Viral Video : सोशल मीडियावर शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर भावुक करणारे असतात. हे व्हिडीओ पाहून शाळेतील दिवस आठवतात. सध्या असाच एक शाळेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका विद्यार्थीनीबरोबर संवाद साधताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील वर्गखोलीतला आहे. या व्हिडीओमध्ये एक विद्यार्थीनी दिसेल. ती तिच्या शिक्षिकेबरोबर बोलताना दिसत आहे.

विद्यार्थीनी – मी तिकडे जायचे म्हणून रडले तर माझे वडील खूप रागावतात. मला एकदिवस शाळेत जायचं नव्हतं तेव्हा माझ्या मोठ्या भावाने पप्पाला फोन लावला तेव्हा पप्पा म्हणाले, कारखान्यावरुन आल्यावर लय मारतो पप्पांनी कारखान्यावरून आल्यावर माझ्या पाठीवर एक धपका टाकला त्यांचे पाचचे पाच ही बोट उमटले होते.

शिक्षिका – प्रत्येकाच्या मम्मी पप्पांना असं वाटतं की त्यांची मुले शाळेत शिकले पाहिजे. तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही दररोज शाळेत आला पाहिजे. पप्पाचं स्वप्न असते की आम्ही ऊस तोडतो, कारखान्यात काम करतो तर आमच्या लेकरांनी शिकून मोठं व्हावं. त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजे. बरोबर आहे की नाही?
मम्मी पप्पाशिवाय तुला करमतं का इथे आज्जी जवळ?

चिमुकली – नाही

शिक्षिका – आठवण येते का नाही त्यांची?

चिमुकली – येते (रडायला लागते)

हेही वाचा

शिक्षिका – केव्हापासून राहते आज्जीकडे?

चिमुकली – पहिलीपासून राहते

शिक्षिका – कधी गावी जाते का?

चिमुकली – सुट्ट्यांमध्ये जाते.

शिक्षिका – रडू नको रडू नको . ते जाऊ दे. तुला शाळेत करमतंय का?

चिमुकली – हो

शिक्षिका – आता तु हुशार झाली. अभ्यास पण करायला लागली (चिमुकलीचे डोळे पुसत)
आता अभ्यास करावासा वाटतो ना?

चिमुकली – हो

त्यानंतर येथेच हा व्हिडीओ संपतो.

ही चिमुकली आईवडिलांपासून दूर आज्जीजवळ राहते आणि आज्जीच्या गावी शाळा शिकते. या व्हिडीओत तुम्हाला आईवडीलांपासून दूर राहणार्‍या चिमुकलीच्या वेदना दिसून येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “हसता हसता चिमुकली रडू लागली..!! प्रत्येक हसरा चेहरा आनंदी असतोच असं नाही..श्रुती अंगणवाडी पासून आज्जी आजोबांजवळ राहते. जेव्हा आई वडिलांविषयी विचारलं तेव्हा..” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा

ranjanajadhav1000 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खुप अवघड आहे हो आई वडिलांना सोडून राहणे..” तर एका युजरने लिहिलेय, “अशा शिक्षिका‌ असल्या म्हणजे आपल्याला परिस्थितीची जाणीव होते आणि अभ्यास वृत्ती निर्माण होते.खुपचं योग्य शिक्षण देताय” आणखी एका युजरने लिहिलेय, “मॅडम जे करतात आज काळाची गरज आहे. मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव राहील” एक युजर लिहितो, “एक सुसंस्कारिक आदर्श शिक्षिका आहेत मॅडम तुम्ही खूप छान कार्य आहे तुमचे… गरिबांच्या लेकरांना खूप जीव लावता… धन्यवाद” तर एक युजर लिहितो, “तुम्ही खूप छान शिकवण देतात मुलाना” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी शिक्षिकेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.