लहान मुले निर्मळ मनाची असतात. मनात जे असतात ते बोलून देतात. कधी कधी त्यांचा खोडसाळपणा पोट धरू हसवतो. त्यांच्या गोंडस वागण्याने वातावरण आनंदी होते. मुलांच्या बाबतीत असाच एक क्यूट प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका शिक्षिकेने आपल्या पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना तिचे चित्र बनवण्यासाठी सांगितले होते. त्यावर विद्यार्थ्यांनी या शिक्षिकेचे चित्र काढण्याचा जोरदार प्रयत्न केला. यातील काही चित्रे पाहून तुम्ही या मुलांच्या कौशल्याचे कौतुक कराल तर, काहींचे चित्र पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे चित्रांमध्ये?

निशात यांनी ट्विटर वर स्वतच्या छायाचित्रासह मुलांनी काढलेल्या चित्रांचे फोटो टाकले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निशात यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांना गूण देखील दिले आहेत. एका विद्यार्थ्याने मास्क घातलेल्या निशात यांचे स्केच बनवले आहे. या चित्रात डोके जाग्यावर असून इअररिंग योग्य ठिकाणी असल्याचा निर्वाळा निशात यांनी दिला. या चित्राला त्यांनी ९ पैकी १० गुण दिले आहेत.

(Viral : कोलगेट बनवायची मेणबत्ती तर नोकीया.. ‘या’ कंपन्यांच्या पहिल्या उत्पादनांची यादी वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का)

दुसऱ्या एका चित्रात विद्यार्थ्याने निशात यांचे शरीर एका बाटलीसारखे बनवले आहे. त्यांचे केसही फुलासारखे वाटत आहे. या चित्रावर निशात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला केसं आवडल्याचे त्या म्हणाल्या, तसेच शरीर वोडक्याच्या बाटलीसारखे म्हणत चित्राला १० पैकी ५ गूण दिले.

तिसऱ्या स्केचमध्ये निशात एक वस्तू हातात घेऊन उभ्या आहेत. त्यावर ते आयफोन असून चित्रात माझे डोळे सुंदर दिसत असल्याचे निशात म्हणाल्या. चित्रात बारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे म्हणत त्यांनी विद्यार्थ्याला १० पैकी ८ गुण दिले.

(Viral video : ‘या’ विशेष विमानाने भारतात आले चित्ते, लूकमुळे आधीच चर्चेत, पाहा विमानाचे आतील दृश्य)

चौथ्या चित्रात आपल्या ड्रेससोबत काय झाले आहे काही कळत नसल्याचे निशात म्हणाल्या. मात्र त्यांनी पापणीच्या केसांचे कौतुक केले आहे. त्यांनी या चित्राला १० पैकी ६.५ गुणे दिलेत. त्याचबरोबर पाचवे चित्रे मॉडर्ण दिसत असल्याचे निशात म्हणाल्या. त्यांनी या चित्राला १० पैकी ६.५ गुणे दिलेत.

नेटकऱ्यांनी चिमुकल्यांच्या कलेचे केले कौतुक

पहिल्या वर्गातील मुलांनी आपल्या शिक्षिकेचे काढलेले चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने या चित्रांचे कौतुक केले आहे. खूप सुंदर चित्रे बनवल्याचे तो म्हणाला. दुसऱ्या एका यूजरने चित्र पाहून हे वास्तववादी असल्याचे म्हटले.