तुम्ही कधी तोंड नसलेला मासा पाहिलात का ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यावर शास्त्रज्ञांना तोंड नसलेल्या माशाची नवी प्रजाती आढळली आहे. तोंड नसल्याने या माशांना फेसलेस फिश ‘Faceless’ fish असं नाव देण्यात आलंय. खोल समुद्रात आढळलेला या माशाला डोळे नसले तरी तो अंधारात उत्तम पोहू शकतो. १८७४ मध्ये हा मासा आढळला होता, त्यानंतर तब्बल १४३ वर्षांनी हा दुर्मिळ मासा पुन्हा एकदा शास्त्रज्ञांना सापडला. या माशाला डोळे नाहीत, खोल समुद्रात हा मासा आढळल्याने आता सगळ्यांना त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालंय. जिथे सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही तिथे या माशाचा वावर असतो. इथे गोठवून टाकणारं तापमान आणि अन्नाची अत्यंत कमी उपलब्धता अशा बिकट परिस्थितीतही हा मासा जिवंत राहू शकतो. त्याला डोळे नसले तरी समुद्रात तो इतका सहज कसा पोहू शकतो याचा शोध आता शास्त्रज्ञ घेत आहेत.
शास्त्रज्ञांना सापडला तोंड नसलेला मासा
तब्बल १४३ वर्षांनी हा दुर्मिळ मासा सापडला
Written by लोकसत्ता टीम
First published on: 02-06-2017 at 17:48 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A team of international scientists have discovered faceless fish in the deep sea