आजच्या धावपळीच्या जगात लोक माणुसकी कुठेतरी विसरून गेले आहेत. अनेकदा परिस्थिती समजून न घेता समोरच्याचा वाईट प्रसंगी त्याचा फायदा घेतला जातो. तर पुढे जाण्याच्या नादात एखाद्याच नुकसान केलं जात. पण, काही असेही लोक आहेत ज्यांना माणुसकीचा विसर पडलेला नाही. असाच एक व्हिडीओ आज प्रचंड व्हायरल होत आहे. भर रस्त्यात एका चालकाचा टेम्पो पलटी होतो. तेव्हा रत्यावरून ये-जा करणारे प्रवासी त्यांच्या मदतीला धावून जातात.
व्हायरल व्हिडीओ अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळचा आहे. जिथे हजारो केळींनी भरलेला टेम्पो रस्त्यात उलटला आहे. टेम्पो पलटी झाला असून केळी भरलेले बॉक्स रस्त्यावर पसरले आहेत. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे. मात्र टेम्पो चालकाला मदत करण्यासाठी काही तरुण तेथे पोहोचले आणि चालकास पुन्हा केळी भरून देण्यास मदत करू लागले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच.
व्हिडीओ नक्की बघा :
तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, रस्त्यावर टेम्पो पलटी झाला आहे. तसेच सर्वत्र केळ्यांनी भरलेले बॉक्स रस्त्यावर पसरले आहेत. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं आहे आणि गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे. हे बघता काही तरुण मदत करण्यासाठी पुढे आले आहेत आणि टेम्पो चालकास रस्त्यावर पडलेली केळी उचलण्यासाठी मदत करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Hatindersinghr3 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये घडलेला सर्व प्रकार थोडक्यात लिहिला आहे. ‘संकटात इतरांचा कधीही फायदा घेऊ नका’ अशी कॅप्शन सुद्धा या व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया देताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.