भारतामध्ये काही राज्यामध्ये बिपरजॉय वादळामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे आयुष्य प्रभावित केले पाहिजे. या वादळामुळे देशाच्या काही भागांमध्ये भयावह दृश्य पहायला मिळत आहे. एकीकडे जिथे बिपरजॉय वादळामुळे कित्येक लोकांचे आयुष्य फार कठीण झाले आहे. तर काही व्हिडिओ सोशल मीडियावर या काळामध्ये व्हायरल होत आहे. सध्या एक वादळाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून सर्व जण थक्क झाले आहेत. खरं तर हा व्हिडिओमध्ये वादळाचे भयंकर रुप पाहायला मिळत आहे. वादळापासून वाचण्यासाठी लोक छप्पर पकडून उभे आहेत. वारा इतका जोरात वाहत आहे की स्वत:ला सावरताना हे लोक हवेत उडताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील आहे जिथे जेवणासाठी आलेले लोक अचानक वादळ आल्यामुळे संकटात सापडतात. या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, रेस्टॉरंटमध्ये अत्यंत वेगाने वादळ येते जे खुर्ची, टेबल सर्व काही त्यासोबत उडून जात आहे. काही लोकांना वादळापासून वाचण्यासाठी एका खांबाला पकडून उभे आहेत. पण वारा इतका जोरात वाहतो आहे की, लोक ज्या खांबाला पकडून आधार घेत होते तोही वादळाच्या झपाट्यात येतो.

हेही वाचा – सख्खा भाऊ पक्का वैरी! भावाला वैतागून वावर विकणे आहे, सोशल मीडियावर पोस्टर तुफान व्हायरल

हेही वाचा – विकी कौशलने Obsessed गाण्यावर केलेला डान्स झाला ट्रेंड, लोकांना प्रचंड आवडला व्हिडिओ, ट्विटरवर मीम्सचा पाऊस

हवेत उडाले लोक

जसा खांब वाऱ्यासोबत उडू लागतो तसा त्याला पकडून थांबलेले काही लोकही त्याबरोबर हवेमध्ये उडू लागतात. काही लोकांनी वेळीच खांब सोडून देतात. तर काही लोक खांबाबरोबर हवेमध्ये उडतात. एका व्यक्ती खांब सोडल्यानंतर जमिनीवर पडताना दिसत आहे. हे दृश्य फार भयावह आहे. पूर्ण रेस्टॉरंटची सेटिंग खराब झाली आहे. लोक अडोश्याला उभे राहून हे भयावह वादळ शांत होण्याची वाट पाहात आहे.

हेही वाचा – टॉयलेटमध्ये बसला होता व्यक्ती, शॉवरवर लटकणारा भलामोठा अजगर पाहून उडाला थरकाप अन्…

३ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये एका ट्विटर यूजर @el_karadepapaने पोस्ट केलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. आतापर्यंत हे समजले नाही की ही घटना कुठली आहे. पण या व्हिडिओमध्ये चक्रीवादळ बिपरजॉयचा काही संबध आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A terrible storm came to the restaurant suddenly people started flying exciting video came out snk
Show comments