Agra Viral Video : उत्तर प्रदेशातल्या आग्रा या ठिकाणी एका पर्यटकाला काठीने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण झालेला पर्यटक दिल्लीहून ताज महाल पाहण्यासाठी आला होता. पण तो आता आयुष्यभरासाठी कटू आठवण घेऊन बसला आहे.

हे पण वाचा- प्रियकराला भेटण्यासाठी प्रेयसी अख्ख्या गावाची लाईट घालवायची, विचित्र आयडीया अंगलट आली पण शेवटी मनासारखं झालं

गाडीचा धक्का लागल्यामुळे हा वाद झाला आणि दिल्लीहून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या या पर्यटकाला मारहाण झाली अशी माहिती मिळते आहे. या प्रकरणी काँग्रेसने योगी सरकारच्या कारभारावर आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दुसरीकडे समाजमाध्यमांवर व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sam Konstas Fan Crashes His Car While Trying to Take with Australian Opener Video Goes Vira
VIDEO: सॅम कॉन्स्टासला भेटण्यासाठी चाहत्याने केली घोडचूक, चालत्या गाडीतूनच उतरला अन्…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक

काय आहे व्हायरल व्हिडीओत?

दिल्लीतला एक पर्यटक ताजगंजच्या बसाई चौकी भागात आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याच्या गाडीचा धक्का काही लोकांना लागला. ही घटना घडतात १० ते १५ लोकांच्या टोळक्याने या पर्यटकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. पीडित पर्यटक स्वतःला वाचवण्यासाठी दुकानात शिरला. मात्र टोळक्याने त्याचा पिच्छा सोडला नाही. दुकानात शिरुनही या पर्यटकाला मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना दुकानातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हे पण वाचा- VIDEO: टोल भरण्यावरून राडा! ओळखपत्र मागितल्यानं महिलेला भयंकर मारहाण, केस ओढत लाथा बुक्क्यांनी..

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी गुन्हा नोंदवला. सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी तीन पथकंही तयार केली. आत्तापर्यंत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, टोळक्यातील इतरांचा शोध पोलीस करत आहेत.

Story img Loader