Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असताता. भारतात जुगाडू बाईक चालवणाऱ्यांची कमतरता नाही. कोणी रिक्षाचं इंजिन बाईकला लावतेय, तर कोणी बाईकचं इंजिन काढून त्याची सायकल बनवतंय, कोणी इंधनाची टाकी काढून बाटल्या लावतोय, तर कोणी बाईकला पंखे लावून हेलिकॉप्टर बनवतंय. पण अशी बाईक तुम्ही आपल्या आयुष्यात कधीच पाहिली नसेल. एका तरुणानं चक्क बाईकला ट्रॅक्टरचं चाक लावलंय. हो बाईकला ट्रॅक्टरचं चाक हे तुम्ही बरोबर वाचलं. आता याचा व्हायरल होणारा व्हिडीओही पाहा. हा व्हिडीओ पाहन तुम्हीही डोक्याला हात लावाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात तरुणांच्या क्रिएटिव्हिटीची कमी नाही, तरुण कधी काय डोकं लावतील याचा नेम नाही. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करताना कधी एखादा हटके जुगाड करतील याचा भरोसा नाही. अशाच एका तरुणानं पल्सर बाईकला पुढचं चाक ट्रॅक्टरचं बसवलं आहे. अनेकजण थक्क झाले आहेत. देशात असे अनेक जुगाड लोक आहेत, जे कधी कधी आपल्या कर्तृत्वाने लोकांना आश्चर्यचकित करतात, ज्याची कल्पनाही करता येत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाची झलकही काही जुगाडांमध्ये पाहायला मिळते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> फूटपाथ, भरधाव कार अन् मृत्यू; इतकी भयंकर टक्कर की महिलेचा जागीच गेला जीव! धक्कादायक VIDEO समोर…

हा व्हिडीओ mrhifixyz या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्‍चर्य वाटते आणि काही व्हिडीओ बघून आपल्याला हसू येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tractor wheel attached to a plusre bike a unique desi jugad going viral on social media srk