कोणावर कधी कोणत संकट येईल हे सांगता येत नाही असं आपण नेहमी म्हणत असतो. त्यामुळे लोकांनी सदैव सावध रहायला हवं. कारण, संकट काही सांगून येत नसतात. सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यामध्ये निष्पाप लोकांना त्यांची काहीही चुक नसताना जीव गमवावे लागतात. तर काही व्हिडीओ असे असतात ज्यामध्ये अत्यंत भयंकर संकटातून काही लोक सुखरुपरित्या वाचतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चहा पित असताना अचानक त्याच्यावर मोठं संकट ओढावतं मात्र सुदैवाने तो या संकटातून बचावतो.

हेही पाहा- नवरी आहे की रबरबॅंड! वरमाला घालताना नवऱ्याच्या नाकी नऊ आले, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Shocking video viral
थंडीत काकांनी केले जीवघेणे कृत्य, सिलिंडरला लावली आग अन्… VIDEO मध्ये पुढे काय घडलं एकदा पाहाच
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
VIDEO Viral: Drunk Youth Climbs Mobile Tower In Bhopal, Creates Ruckus video goes viral on social media
VIDEO: देशी दारु अशी चढली की…मद्यधुंद तरूणाचा मोबाईल टॉवरवर चढून धिंगाणा; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
Viral Video Of Bride And Her Brother
VIDEO: भर लग्नात भावाने बहिणीची सांगितली हटके सवय; नवऱ्याचे उत्तर ऐकून नवरी झाली लाल, नेटकरी म्हणाले “सात वचनांमध्ये…”
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Shocking video Kadayanallur the Auto Rickshaw Toppled While The Driver Was Trying To Slap A Boy Who Was Riding A Cycle On The Road video goes viral
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ५ सेकंदात रिक्षाचालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं?
disgusting dirty video of tea in train goes viral
“जीव घेणार का आता?” ट्रेनमध्ये चहा बनवणाऱ्यानं अक्षरश: हद्दच पार केली; ट्रेनमध्ये चहा पिणाऱ्यांनो VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

@BornAKang या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात छत्री धरुन झाडाखाली चहा पित उभा राहिल्याचं दिसतं आहे. तो चहा पित असताना अचानक त्याच्या अंगावर झाडीची मोठी फांदी पडते, पण प्रसंगावधान राखत हा व्यक्ती चपळाईने त्या जागेवरुन बाजूला सरकतो. तो एवढ्या जोरात पळण्याचा प्रयत्न करतो की तो त्याच ठिकाणी पाय घसरुन पडतो.

हेही पाहा- रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका बिघडली, दुचाकीस्वारांनी १२ किमी ढकलत हॉस्पिटलपर्यंत नेली, पाहा Video

मात्र, तो झाडाच्या फांदीखाली न सापडल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला आहे. कारण, झाडाच्या फांदीचा टोकदार भाग सरळ येऊन त्या व्यक्तीच्या शेजारी पडल्याचं व्हिडीओत दिसतं आहे. तो काही इंच जरी पुढे गेला असता तर निश्चितच त्याला मोठी दुखापत झाली असती कदाचित जीव देखील गमवावा लागला असता.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत तो १ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जर झाडाची फांदी काही इंच अलिकडे आली असती तर या व्यक्तीला जीव गमवावा लागला असता.’ अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ‘माझ्यासोबतही असा प्रकार घडल्याचे एकाने सांगितलं आहे. शिवाय आता कुठेही चहा पिताना आधी वर बघायला हवं नाहीतर जीव गमवावा लागायचा, अशी मिश्कील टिप्पनीदेखील एका व्यक्तीने केली आहे.

Story img Loader