Viral Video : सोशल मीडियावर अनेक जण अनेक प्रकारचे व्हिडीओ शेअर करतात. कोणी आपली कला दाखवतात, तर कोणी त्यांनी अनुभवलेले चांगल्या वाईट गोष्टी सांगतात. काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते तर काही व्हिडीओ पाहून मन भावुक होते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने एका वृद्ध जोडप्याशी संवाद साधला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण सांगतो, “काही दिवसांपूर्वी मला कोणीतरी एक हा फोटो पाठवला. (आजी आजोबांचा फोटो) आणि काय मी ठाणे स्टेशनवर खरं प्रेम बघितलं”
पुढे या व्हिडीओत हा तरुण या आजी आजोबांबरोबर संवाद साधताना दिसतो.
तरुण- तुमचे लग्न कधी झाले?
आजोबा – १२ मार्च १९८२
आजी – ४३ वर्ष
तरुण – तुम्ही स्टेशनवर कधी येता?
आजी – नेहमी, आम्ही रोज येतो. कोणी ऑर्डर दिली तर तिथे सोडायला जातो.
तरुण बॅगमधील चकल्या कचोरी आणि चिवडा बघतो.
तरुण- आजोबा तुमची दृष्टी कधीपासून गेली?
आजोबा – दोन अडीच वर्षाचा असताना
तरुण- जेव्हा लग्न झालं तेव्हा माहिती होतं की तुमच्या होणाऱ्या नवऱ्याची दृष्टी गेलेली आहे आणि तरीही तुम्ही लग्न केलं
आजी – हो मी केलं. जर आपलं अस असतं तर कोणी केलं नसतं का
आजोबा- मी हा विचार केला की माझे डोळे तसे आहेत, तिचा हात असा आहे (आजीचा हात अक्षम आहे) म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना समजून घेऊ
आजी – एकमेकांना साथ देऊ, जीवनसाथी
तरुण- तुम्हाला आज्जी कशा मदत करतात?
आजोबा – ती जेवण बनवते. ताट वाढून देणार, पाणी देणार काही गोष्टी मी स्वत:ही करतो. तिला भाजी कापून देतो. एखादा शेफ नाही कापणार एवढे सुंदर भाजी कापतात
तरुण – तुमच्यासाठी प्रेमाचा अर्थ काय?
आजोबा – याच वयात गरज असते एकमेकांची.
आजी -भांडण हो, काहीही हो पण आम्ही एकमेकांशिवाय दोन मिनिटे राहू शकत नाही,
आजोबा – घर आहे. भांड्याला भांडं लागतं पण भांडं तुटणार नाही
तरुण- सध्या तुमच्या काय गरजा आहे?
आजी – आम्हाला फक्त स्टॉलची गरज आहे. उभं राहावं लागतं
तरुण – आताच्या पिढीला काय संदेश द्याल?
आजोबा – मेहनत हमारा नारा. मेहनत करा. स्वत:साठी जगला तर मेला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला.

Puneri patya The world knows you because of these two things viral puneri pati
“या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते…” पुणेरी पाटीची सर्वत्र चर्चा; वाचून तुम्हालाही कळेल आयुष्याचा अर्थ
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
Bhiwandi Live Accident at Rajiv Ghandhi Flyover shocking video
VIDEO: भिवंडीमधला थरारक लाईव्ह अपघात; कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन् भयंकर घडलं, सांगा चूक नक्की कुणाची?
Viral Video Of Cat And Her Little kitten
‘आई ती आईच…’ १० पावले चालल्यावर पिल्लाला मागे वळून पाहणाऱ्या मांजरीने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा हृदयस्पर्शी Viral Video
When The teacher asked students for homework students told hilarious reason
“गृहपाठ का केला नाही?” विद्यार्थ्यांनी दिलेली कारणं ऐकून आठवेल तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस, मजेशीर VIDEO व्हायरल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

हा संपूर्ण व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : शाळेला दोन दिवस दांडी मारुन घरी निवांत टिव्ही पाहत होता विद्यार्थी, अचानक शिक्षक आले; पाहा VIDEO, पुढे काय घडले…

या तरुणाचे नाव सिद्धेश लोकरे असून तो सोशल मीडियावर गरजू लोकांबरोबर संवाद साधतो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sidiously_ या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सिद्धेश लोकरेने हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मला ठाणे रेल्वे स्टेशनजवळ भीमराव आणि शोभा सापडले आणि पुढे जे घडले ते अगदी सारक होते.

भीमराव हे दृष्टिहीन आहेत आणि शोभा यांचा एक हात अक्षम आहे तरी त्यांच्या शारीरिक मर्यादांनी त्यांना कुटुंब म्हणून एकमेकांबरोबर राहण्यापासून कधीच रोखले नाही.

ते कॅलेंडर, चकली, लाडू, बाकरवडी आणि बरेच काही विकण्यासाठी दररोज ठाणे स्टेशनवर येतात.

खरं प्रेम आणि सहवास म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण माझ्यासाठी हे दोघेही आहे.”

हेही वाचा : “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” स्वत:च्या हळदीत मराठमोळ्या गाण्यावर नवरीचा धम्माकेदार डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले फॅन्स

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “”स्वतःसाठी जगला तो मेला आणि दुसऱ्यासाठी जगला तो जगला” तर एका युजरने लिहिलेय, “घर आहे भांड्याला भांडं लागतं पण तुटणार नाही!!” आणखी एका युजरने लिहिलेय, “मराठी माणुस” एक युजर लिहितो, “मला व्हिडीओ पाहून रडू आले” तर एक युजर लिहितो, “साधेपणात सौंदर्य” अनेक युजर्सनी आजी आजोबांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader