लग्नानंतर मुलीने नोकरी करायची की नाही यापासून सर्व गोष्टी तिच्या जोडीदारावर अवलंबून असतात. जोडीदार चांगला कमवत असेल तर अनेकदा मुलींना नोकरी करण्याची गरज नसते. पण, कधी-कधी दोन्ही जोडीदार एकत्र मिळून नोकरी करतात आणि त्यांचा सुखी संसार चालवतात. तर आज सोशल मीडियावर अशीच एक गोष्ट पहायला मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील एक जोडपं एकत्र एकाच बसमध्ये काम करतात. बायको बसचालक आहे, तर नवरा कंडक्टर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमधील एका जोडप्याची चर्चा रंगली आहे. हे जोडपं बसमध्ये एकत्र नोकरी करतात. बायको बसचालक आहे, तर नवरा कंडक्टर आहे. दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात महिला बस चालवत आहे, तर तिचा जोडीदार प्रवाशांना तिकीट देतो आहे. हे खास जोडपं उत्तर प्रदेश परिवहन बसमध्ये काम करत आहेत. या अनोख्या जोडप्याचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा..

हेही वाचा… दिल्लीकरांचा श्वास गुदमरतोय! प्रदूषण रोखण्यासाठी आनंद महिंद्रांनी VIDEO शेअर करत सुचवला उपाय, पाहा तुम्हाला पटतोय का..

व्हिडीओ नक्की बघा :

बायको बसचालक, तर नवरा कंडक्टर :

बसचालक महिलेचं नाव वेद कुमारी, तर जोडीदाराचे नाव मुकेश प्रजापती असे आहे. एकेकाळी या महिलेचं स्वप्न पोलिस अधिकारी बनण्याचे होते, जी आता बसचालक बनली आहे. पण, तीचं हे स्वप्न काही कारणास्तव पूर्ण झालं नाही. तर आता ती उत्तर प्रदेशच्या परिवहन बसमध्ये बसचालकची नोकरी करते आहे. प्रवासादरम्यान एक व्यक्ती यांचा व्हिडीओ शूट करते आणि शेअर करते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gyanu999 या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या अनोख्या जोडप्याची माहिती देत, वेद कुमार या महिलेचं धाडस देशातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरते आहे, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे आणि सोशल मीडियावर या जोडप्याची गोष्ट अनेकांचं लक्ष वेधून घेताना दिसते आहे. तसेच व्हिडीओ पाहून अनेक जण या जोडप्याचं विविध शब्दांत कौतुक करताना दिसून आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A unique story of a couple from uttar pradesh wife is a bus driver husband is a conductor asp