स्वच्छता कर्मचारी सकाळी लवकर उठून परिसर स्वच्छ करतात. तसेच अनेक ठिकाणी सकाळी कचरा टाकण्यासाठी कचऱ्याची गाडी येते, जिथे आपण कचरा नेऊन टाकतो. पण, सोशल मीडियावर आज एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एका अनोख्या साधनाच्या सहाय्याने कचरा काढण्यात येत आहे. व्यक्तीने रस्त्यावरील कचरा काढण्यासाठी अनोखा जुगाड शोधून काढला आहे. व्यक्तीने गाडीवर एक मशीन जोडून घेतली आहे की, ज्याने रस्त्यावरील कचरा अगदी सहज काढला जातो आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, व्हिडीओत मालाची वाहतूक करणारे वाहन दिसत आहे. या वाहनाच्या मागे एक अनोखं मशीन जोडलं आहे; जे एका माणसाने बनवल्याप्रमाणे दिसत आहे. कारण या जोडलेल्या मशीनवर बांबू आणि झाडू लावण्यात आले आहेत. बांबू आणि झाडूची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, ज्याने रस्त्यावरील कचरा अगदी सहज काढला जातो आहे. रस्त्यावरील कचरा काढण्यासाठी व्यक्तीने कशाप्रकारे जुगाड करून मशीन तयार केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
हेही वाचा… VIDEO: गिझरचा वापर करता? काळजी घ्या! नाहीतर…९० टक्के लोक करतात ही चूक; तरुणीनं सांगितला अनुभव
व्हिडीओ नक्की बघा :
बांबू आणि झाडूचा उपयोग करून बनवली अनोखी मशीन :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गाडी पुढे सरकते आणि रस्तासुद्धा आपोआप साफ होताना दिसतो आहे. कारण व्यक्तीने अगदीच हटके जुगाड केला आहे. त्याने माल वाहून नेणाऱ्या गाडीवर अशा प्रकारे एक साधन बनवून घेतलं आहे की, कोणतीही मेहनत न घेता रस्त्यावरील कचरा अगदीच सहज साफ होताना दिसत आहे. गाडीच्या मागच्या बाजूला एका मशीनवर बांबू लावून घेतले आहेत आणि त्यावर चार झाडू लावण्यात आले आहेत. एका पंख्याप्रमाणे हे साधन दिसते आहे, जे रस्त्यावर कचरा साफ करण्याचे काम करते आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हे साधन पाहून अनेक नेटकऱ्यांना
साउथ इंडियन सिनेमा बाहुबलीची आठवण झाली. या सिनेमामध्ये भल्लालदेवचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्याच्या रथावर एक पंखा असायचा, ज्यावर सूरी असायच्या. शत्रू समोर आला की, हा पंखा फिरायचा आणि समोरची व्यक्ती जखमी व्हायची. तर अगदी याच रचनेप्रमाणे व्हिडीओतील व्यक्तीने हे कचरा काढण्याचे साधन बनवले आहे आणि सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.