एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की, अनेकदा भाड्याने जागा घ्यावी लागते किंवा तुम्हाला लोन काढून एखादी जागा विकत घ्यावी लागते. प्रत्येकालाच ते शक्य नसते. त्यामुळे काही जण स्वतःच्या घरात, एखादा टेबल लावून किंवा स्वतःच्या गाडीचा वापर करूनसुद्धा त्यांचा व्यवसाय करण्यास सुरुवात करतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तरुणाने व्यवसाय करण्यासाठी त्याच्या दुचाकीचा उपयोग केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, व्यापारी त्याची रॉयल एनफिल्ड दुचाकी घेऊन येतो. या दुचाकीला छोट्या इंजिनसारखी दिसणारी एक खास वस्तू जोडलेली असते. बघता बघता त्याचे रूपांतर एका छोट्या स्टॉलमध्ये होते, ज्यात ग्राहकांना प्लेट ठेवण्यासाठी जागा, गॅस आहे आणि चाटचे विशिष्ट पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींची यात सोय करण्यात आली आहे. तरुणाने कशाप्रकारे स्वतःच्या व्यवसायासाठी खास सोय केली आहे, एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…नवीन वर्षाचे केले अनोखे स्वागत! सुदर्शन पटनायक यांनी पर्यावरणाचा संदेश देत साकारले वाळूशिल्प…

व्हिडीओ नक्की बघा :

व्यापारी सुरतचा रहिवासी आहे. तसेच हा ‘आलू पुरी’ ही खास चाट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा तरुण या गाडीला जोडलेल्या स्टॉलवर त्याची आलू पुरी बनवण्याची पद्धतसुद्धा दाखवत आहे. सगळ्यात पहिले त्याने बटाट्याचे काप डिशमध्ये ठेवले आहेत. त्यानंतर त्यावर पुदिना आणि चिंचेची चटणी घातली आहे आणि वरून लसूण चिवडा टाकण्यात आला आहे. त्यानंतर त्यावर चीज किसून टाकतो.अशा पद्धतीने त्याची प्रसिद्ध ‘आलू पुरी’ चाट तयार झाली आहे.

तरुणाने अगदीच भन्नाट जुगाड करून त्याच्या बाईकचा उपयोग व्यवसायासाठी केला आहे, जो आजवर तुम्ही कधी पाहिला नसेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @denish.tanna या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजर एक फूड ब्लॉगर आहे, जो अश्या अनोख्या व्यापाऱ्यांचे व्हिडीओ पोस्ट करत असतो.