भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे येथे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. यापैकी काही परंपराच आपल्याला माहित असतात. तर बऱ्याच परंपरांबद्दल तर आपल्याला माहिती देखील नसतं. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन आहे परंतु लग्न समारंभ पार पडताना अनेक पारंपारिक परंपरा सुद्धा आपल्याला पाळाव्या लागतात.या परंपरे शिवाय लग्न समारंभ अर्धवटच आहे परंतु काही ठिकाणी अद्यापही अशा आगळ्यावेगळ्या परंपरा पाहायला मिळतात, अशावेळी आपण विचार करण्यास प्रवृत्त होतो. जगामध्ये लग्नाशी निगडित अशा काही परंपरा आहेत ज्या जर आपण जाणून घेतल्या तर आपण हैराण होऊ शकतो. अशातच लग्नातील आणखी एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आलाय. ज्याला पाहून तुम्ही म्हणाल अशीही प्रथा असते.
लग्नात गाव देव अशी एक पद्धच असते, म्हणजे लग्नापूर्वी नवरदेव गावातील काही मंदिरात जाऊन पाया पडतो. त्यानंतर लग्नाची मिरवणूक काढताना नवरदेव घोडयावर बसून वधूच्या घरी जातो. सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या मिरवणुकीचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडीओने सध्या इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरदेवाला घोड्यावर बसवलं असून घोड्यालाही खाटेवर चढवलं आहे. नंतर घोड्यासह नवरदेवाला घेऊन गोल गोल फिरवलं. यावेळी त्या नवरदेवाचा तोल जाण्याची भीती आहे, मात्र तरीही हा नवरदेव बिंधास्त घोड्यावर बसला आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – नसतं धाडस कशाला? मगरीला खायला घालायला गेला नदीकाठी अन्… Video सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत लाखो व्ह्यूज व्हिडीओला मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ravirajsinh_rajput_0007 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.