Viral Video : अनेक जण नोकरी आणि शिक्षणासाठी गाव सोडून शहराकडे येताना दिसतात पण गाव हे गाव असते. तेथील जीवनशैली, जीवन जगण्याची पद्धत, जेवण आणि सवयी या जगावेगळ्या असतात. सोशल मीडियावर गावाकडील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडची दिवे लावण्याची अनोखी पद्धत दाखवली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये झाडावर दिवा लावण्याची हटके पद्धत दाखवली आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, गावाकडच्या काकू शेणाच्या मदतीने झाडाच्या खोडावर दिवा साकारताना दिसत आहे. त्यानंतर या दिव्यावर फूलांनी सजावट सुद्धा करतात. पुढे व्हिडीओत एक चिमुकली रात्रीच्या अंधारात येताना दिसते आणि या झाडाच्या खोडावर पेटलेला दिवा ठेवते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही ही अनोखी पद्धत करावीशी वाटेल.
हेही वाचा : लहानपण देगा देवा.. मित्रांना बैल बनवून लावली बैलगाडा शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ
nature_beauty_1208 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावाकडची दिवे लावण्याची पद्धत…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खुप छान. पहिल्यांदाच पाहिलं असे काहीतरी” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान यामुळे झाडाला नुकसान पण नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपली संस्कृती आपला अभिमान”